MLA H. Vishwanath & Other Leader Sarkarnama
विशेष

BJP NEWS : भाजपला सत्तेवर आणण्यासाठी मदत केल्याचा पश्चाताप होतोय : ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

डबल इंजिन सरकारने राज्यात मोठ्या प्रमाणावर विकासाचे स्वप्न पाहिले होते. पण, ते सगळं उघड पडलं, असे सांगून विश्वनाथ यांनी नाराजी व्यक्त केली.

सरकारनामा ब्यूरो

बंगळूर : काँग्रेस (Congress) आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे आघाडीचे सरकार कोसळून राज्यात भाजपचे (BJP) सरकार येण्यास कारणीभूत ठरलेले विधान परिषद सदस्य एच. विश्वनाथ यांनी सोमवारी पश्चाताप सत्याग्रह केला. त्यांना काही पुरोगामी विचारवंतांचीही साथ मिळाली. (Regrets for helping bring BJP to power : MLA H. Vishwanath)

आमदार एच. विश्वनाथ यांनी म्हैसूर येथील न्यायालयाच्या आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवून काही काळ प्रतिकात्मक पश्चात्तापाचा सत्याग्रह करण्यात आला. त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभारलेल्या मंडपामध्ये बसून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास के. एस. भगवान, बसवलिंगय्या आणि इतर अनेक पुरोगामी विचारवंतांनी एच. विश्वनाथ यांना पाठिंबा दिला आहे.

या वेळी बोलताना एच. विश्वनाथ यांनी भाजपसारखे भ्रष्ट सरकार सत्तेवर येण्यास मदत केल्याबद्दल खंत व्यक्त केली. विसंगत काँग्रेस-धजद युती सरकारचा राज्याला फायदा होणार नाही; म्हणून अपरिहार्यपणे भाजपमध्ये सामील होणे भाग पडले. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्याने राज्यातही त्याच पक्षाचे सरकार आले, तर कर्नाटकाच्या विकासचा वेग वाढेल, असा विचार करून मदत केल्याचे ते म्हणाले.

डबल इंजिन सरकारने राज्यात मोठ्या प्रमाणावर विकासाचे स्वप्न पाहिले होते. पण, ते सगळं उघड पडलं, असे सांगून विश्वनाथ यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, भाजपमध्ये सामील झालेल्या बहुतांश पक्षांतरितांच्या ओठावर असाच विचार येत आहे. पक्षी स्थलांतरित क्षेत्रात कधीही स्थायिक होत नाहीत. ते परत आपल्या भागात येतात, असे ट्विट काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT