Mumbai News : महसूल व पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री, सन्मानीय विखे पाटील अशा दोनवेळा आवाज विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना दिला. त्याचवेळी एका आमदाराने मोठ्याने विखे पाटील साहेब अशी हाक मारली. त्यानंतर जागे झालेल्या विखे पाटील यांनी आपल्या विभागाचे विधेयक मांडले. (Revenue department bill came, but Vikhe Patil was fast asleep in the hall)
विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सभागृह नेते एकनाथ खडसे यांचे भाषण संपले. त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam gorhe) यांनी महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या नावाचा विधेयक मांडण्यासाठी पुकारा केला. पण, त्यावेळी विखे पाटील आपल्या आसनावर गाढ झोपेत होते. महसूल व पशुसंवर्धन मंत्री, सन्माननीय विखे पाटील असा आवाजही गोऱ्हे यांनी दिला. त्याचवेळी एका सदस्याने मोठ्याने विखे पाटील साहेब अशी हाकही मारली. शेवटी जागे झालेल्या विखे पाटील यांनी आपले विधेयक मांडले.
काही भाषणांचा परिणाम होतो, अशी कोटीही उपसभापती गोऱ्हे यांनी या वेळी केली. खडसे साहेब, तुम्हाला विनंती आहे, असे म्हणत त्यांनी एकनाथ खडसे यांनी केलेल्या भाषणाबद्दल हातही जोडले.
झोपेतून जागे झालेल्या विखे पाटील यांनी विधानसभा विधेयक ३६ महाराष्ट्र लोकायुक्त विधेकय २०२२ यावर विचार करण्यासाठी नेमलेल्या संसदीय समितीचा अहवाल सादर करण्यासाठी निश्चित केलेली मुदत पुढील विधान परिषदेच्या अधिवेशनाच्या अखेरपर्यंत वाढविण्यात यावी, असा प्रस्ताव विखे पाटील यांनी मांडला.
विधेयकावर आपल्याला भाषण करायचे आहे का?, अशी विचारणाही नीलम गोऱ्हे यांनी महसूल मंत्री विखे पाटील यांना केली. मात्र, काही गरज नाही, असे म्हणत विखे पाटील यांनी विधयेकावर भाषणही केले नाही. दरम्यान, विखे पाटील यांनी मांडलेले विधेयक आवाजी मताने मंजूर करण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.