Sakal Election Survey Sarkarnama
विशेष

Sakal Election Survey : भाजपला मतदान करायला आवडेल; 'सकाळ'च्या सर्व्हेत लोकांनी थेटच सांगितलं

Lok Sabha Election 2024 : भाजपने राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर गटाला बरोबर घेतले, मात्र या गटांना लोकांनी थेट नाकारल्याचे दिसून येत आहे.

Sunil Balasaheb Dhumal

Sakal Latest Election 2024 Survey News : देशभरात अब की बार 400 पार असा नारा देत भाजपचे एकहाती 370 जागा जिंकण्याचे टार्गेट आहे. त्यासाठी विरोधातील अनेक नेत्यांना जोडण्याचा सपाटाच पक्षाने लावल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक दिग्गजांना भाजपने गळाला लावले आहे. आता जागावाटपासाठी महायुतीत केंद्रीय पातळीवर खल सुरू आहे. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काही जागांवर अडून बसली आहे. त्या सोडण्यास मात्र भाजप तयार नसल्याची चर्चा आहे. अशातच राज्यातील लोकांनीही भाजपलाच समोर ठेवून मतदान करणार असल्याचे थेटच सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ मीडिया ग्रुप'च्या वतीने उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच राज्यातील सर्व 48 मतदारसंघांतील मतदारांचा कल जाणून घेतला आहे. या सर्व्हेत आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करताना कोणत्या पक्षाची निवड कराल, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला प्रतिसाद देताना तब्बल 33.6 टक्के लोकांनी भाजपला पसंती दिली आहे. त्या खालोखाल काँग्रेसला 18.5 टक्के लोकांनी प्राधान्य दिले आहे.

दरम्यान, भाजपने राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर गटाला बरोबर घेतले आहे. मात्र, या गटांना लोकांनी थेट नाकारल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटास 12.6 तर अजित पवार गटास फक्त 3.9 टक्के लोकांनी पाठिंबा दिला आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटास 12.5 तर शिंदे गटास 4.9 टक्के मतदारांनी पसंती दिली. मनसेला 1.4, वंचितला 3.6, शेकाप 0.3, एमआयएम 0.6, स्वाभिमानी शेतकरी संघटना 0.4, प्रहार 0.3, बहुजन विकास आघाडी 0.6, बीआरएस 0.2, आप 0.5, अपक्ष 1.1, इतरांना 5 टक्के लोकांची मतदान करताना पसंती असणार असल्याचे 'सकाळ'च्या या सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, भाजपने लोकसभा निवडणुकीची देशभर जय्यत तयारी करत 195 उमेदवार जाहीर केले आहेत, तर काँग्रेसने 39 उमेदवारांची नावे स्पष्ट केली आहेत. राज्यात मात्र महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे, तर आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा सुटणार, काँग्रेसला तगडे उमेदवार मिळणार का, साहेबांच्या राष्ट्रवादीतून कोण लढणार, यावर अजूनही खल सुरू आहे. असे असले तरी मतदारांनी मात्र आघाडीच्या पारड्यात भाजपपेक्षा अधिक मते देण्याची भूमिका घेतल्याचेही या सर्व्हेतून स्पष्ट दिसून आले आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT