Sakal Election 2024 Survey : केंद्र-राज्य सरकारच्या कामावर लोक किती समाधानी? काय सांगतो 'सकाळ'चा ताजा सर्व्हे?

Sakal Lok Sabha Election 2024 Survey : "या सर्व्हेच्या माध्यमातून लोकांच्या मनातील राजकीय प्रश्नांचा धांडोळा घेण्यात आला."
Sakal Lok Sabha Election 2024 Survey
Sakal Lok Sabha Election 2024 SurveySarkarnama
Published on
Updated on

Sakal Lok Sabha Election 2024 Survey : आमागी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' मीडिया ग्रुपच्या वतीने मतदारांचा कल जाणून घेण्यासाठी एक महासर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेच्या माध्यमातून लोकांच्या मनातील राजकीय प्रश्नांचा धांडोळा घेण्यात आला. या सर्व्हेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कामगिरीबाबत लोकांना प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये लोकांनी थेट उत्तरे दिली आहेत.

Sakal Lok Sabha Election 2024 Survey
NCP Sharad Pawar News : अजितदादांच्या आमदाराला शरद पवार गटाने मतदारसंघातच घेरले...

केंद्र सरकारच्या कामावर आपण समाधानी का? असा प्रश्न लोकांना विचारण्यात आला. सर्व्हेत सहभागी झालेल्या लोकांपैकी या प्रश्नावर 40.4 % लोकांनी 'होय' असे उत्तर दिले, तर 44.5 % लोकांनी 'नाही' असे उत्तर दिले, तर त्याचवेळी 15.1 टक्के लोकांनी 'सांगता येत नाही', असे उत्तर दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच सर्व्हेतील लोकांना राज्य सरकारबाबतही प्रश्न विचारण्यात आले. महाराष्ट्र राज्य सरकारच्या कामावर आपण समाधानी आहात का? असा प्रश्न लोकांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना 33.6 टक्के लोकांनी 'होय' असे उत्तर दिले, तर त्याचवेळी 50.2 टक्के लोकांनी 'नाही' असे उत्तर दिले. 16.2 टक्के लोकांनी 'सांगता येत नाही', असे उत्तर दिले.

लोकसभा निवडणुकीची जंगी तयारी करून पुन्हा सत्तेत येण्याचा भारतीय जनता पक्षाचा (BJP) डाव आहे, तर विरोधकांना एकत्र आणून काही केल्या, मोदी सरकारला सत्तेबाहेरचा रस्ता दाखविण्याची नीती विरोधी महाविकास आघाडीची आहे. या संघर्षात महाराष्ट्रासह देशभरात फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. त्यातून जिंकणे आणि सत्ता काबीज हा हेतू सत्ताधारी-विरोधी नेत्यांचा आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि देशाचे राजकीय मन जाणून त्यातून मत मांडण्याच्या उद्देशाने 'सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने उमेदवार जाहीर होण्याआधी सर्वेक्षण करण्यात आले.

Sakal Lok Sabha Election 2024 Survey
Shinde comment on BJP Candidate : भाजप सोलापूरसाठी एखादा छुपा रुस्तम उमेदवार काढेल; सुशीलकुमार शिंदेंचा टोला

पुणे, मुंबईसह राज्यभरातील 48 लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघांतील मतदारांची मते जाणून घेण्यात आणि देशाचे राजकीय मन जाणून त्यातून मत मांडण्याच्या उद्देशाने 'सकाळ मीडिया ग्रुप'च्या वतीने उमेदवार जाहीर होण्याआधी सर्वेक्षण करण्यात आले. मतदारांची मते जाणून घेण्यात आली. त्यावरून 'साम' वाहिनीवर चर्चासत्र झाले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com