Sanjay Bansode News, Shivsena Political Crisis News, Maharashtra Political Crisis News  Sarkarnama
विशेष

संजय बनसोडे ठरले बंडाचे लाभार्थी : आता गृहखात्याचा कारभार पाहणार... !

या बंडाचे लाभार्थी हे राष्ट्रवादीचे राज्यमंत्री संजय बनसोडे ठरले आहे. कारण त्यांच्याकडे शंभूराज देसाई यांच्याकडील गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पदाचा कारभार बनसोडे यांच्याकडे देण्यात आला आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यासह नऊ मंत्र्यांना मोठा दणका दिला आहे. या नऊ मंत्र्यांकडील खाती काढून ती इतरांकडे देण्यात आली आहेत. त्यामुळे बंडखोर नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. या बंडाचे लाभार्थी हे राष्ट्रवादीचे राज्यमंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) ठरले आहे. कारण त्यांच्याकडे शंभूराज देसाई यांच्याकडील गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पदाचा कारभार बनसोडे यांच्याकडे देण्यात आला आहे. याशिवाय आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, सतेज पाटील, विश्वजित कदम, दत्तात्रेय भरणे हे या बंडाचे लाभार्थी ठरले आहेत. (Sanjay Bansode will now take charge of the Home Department)

जनहिताची कामे अडकून न राहता ती सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पाच कॅबिनेट मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.(Shivsena Political Crisis News)

या कॅबिनेट मंत्र्यांची खाती काढली आणि यांना दिली

एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल परब यांच्याकडे, दादा भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदीपान भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.

राज्यमंत्र्याकडील खाते वाटपातील बदल

शंभूराज देसाई यांच्याकडील खाती (कंसात) संजय बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण), विश्वजित कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज उर्फ बंटी पाटील, (रा.उ.शु.), राजेंद्र पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण), प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन), आदिती तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य), अब्दुल सत्तार, राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (महसूल), सतेज उर्फ बंटी पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास), आदिती तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य). बच्चू कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) आदिती तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), सतेज उर्फ बंटी पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास), दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण).

महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम 6-अ मध्ये 6-अ अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पाडणे शक्य नसेल त्यावेळी मुख्यमंत्र्यांस आपल्या अनुपस्थितीत आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येईल. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणेशक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निदेश देता येईल अशी तरतूद आहे त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT