Satish Kakade-Avinash Gholap-Prithviraj Jachak
Satish Kakade-Avinash Gholap-Prithviraj Jachak Sarkarnama
विशेष

एकतरी कारखाना पवारविरोधी हवा म्हणून ‘छत्रपती’त जाचक-घोलपांना साथ देणार : सतीश काकडेंची घोषणा

मिलिंद संगई

बारामती : ‘‘छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीत माजी साखर आयुक्त पृथ्वीराज जाचक (Prithviraj Jachak) व कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप (Avinash Gholap) एकत्र येणार असतील आणि त्यांना माझी मदत लागणार असेल, तर मी नक्की मदत करेन,’’ अशी भूमिका शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे (Satish Kakade) यांनी आज (ता. ३ नोव्हेंबर) बोलून दाखवली. (Satish Kakade will support Prithviraj Jachak-Avinash Gholap in Chhatrapati Sugar Factory elections)

बारामतीत (Baramati) पत्रकारांशी संवाद साधताना या परिसरात एक तरी पवारविरोधी (Pawar) कारखाना असायला हवी, अशी उघड भूमिका शेतकरी नेते सतीश काकडे यांनी मांडली. इंदापूर (Indapur) तालुक्यातील आणि बारामती तालुक्याच्या शिवेवर असणारा छत्रपती सहकारी साखर कारखाना दोन्ही तालुक्यांसाठी महत्वाचा आहे. छत्रपती कारखान्याची निवडणूक थोड्याच दिवसांत होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर काकडे यांचे वक्तव्य महत्वाचे मानले जाते.

बारामती-इंदापूर परिसरातील एक तरी साखर कारखाना हा पवार विरोधकांकडे असायला हवा, असे सांगून काकडे म्हणाले की, विरोधी पक्षनेते अजित पवार हे बारामती तालुक्यातील कार्यक्षम आमदार आहेत, त्यांच्या इतका विकास कुणी करु शकत नाही, ही आजही माझी भूमिका असली तरी शेतकरी हितासाठी व त्यांना अधिकचा भाव मिळण्यासाठी या परिसरात एकतरी पवारविरोधी कारखाना असायला हवा, असे सतीश काकडे म्हणाले.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणूकीत पृथ्वीराज जाचक व अविनाश घोलप एकत्र येणार असतील, तर नीरा कॅनॉल सोसायटीच्या माध्यमातून सोसायटी प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढविण्यास माझी तयारी आहे. माजी खासदार आणि शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टीही आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत, असेही काकडे म्हणाले.

आमची भूमिका उसउत्पादकांच्या हिताचीच असेल. त्यांना अधिकचा दर मिळावा; म्हणून मी हे विचार मांडले आहेत. या बाबत अजून काहीही निर्णय झालेला नाही, असेही सतीश काकडे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT