Satyajeet Tambe Sarkarnama
विशेष

Satyajeet Tambe News : सत्यजित तांबे यांचेही काँग्रेसमधून निलंबन होणार; शिस्तपालन समितीची शिफारस

काँग्रेस पक्षाच्या शिस्तपालन समितीने सत्यजित तांबे यांंना पक्षातून निलंबित करण्यात यावे, अशी शिफारस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडे केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : डॉ. सुधीर तांबे यांच्यापाठोपाठ युवक काँग्रेसचे (Congress) माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्यावर निलंबनाची कारवाई अटळ असल्याचे दिसून येत आहे. कारण, काँग्रेस पक्षाच्या शिस्तपालन समितीने सत्यजित तांबे यांंना पक्षातून निलंबित करण्यात यावे, अशी शिफारस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडे केली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत सत्यजित यांच्यावरही काँग्रेसकडून कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. (Satyajeet Tambe will also be suspended from Congress; Recommendation of Disciplinary Committee)

नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी आणि एबी फॉर्म दिला होता. मात्र, डॉ. तांबे यांनी फॉर्म न भरता युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांची चौकशी लावण्यात आली आहे. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

डॉ. तांबे यांच्या निलंबनापाठोपाठ आज लगेच दुसऱ्या दिवशी सत्यजित तांबे यांच्यावरही कारवाई संकेत काँग्रेस पक्षाकडून देण्यात आलेले आहेत. पित्यापाठोपाठ आता मुलावरही कारवाई होणार हे निश्चित झाले आहे. सत्यजित तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी शिफारस काँग्रेस पक्षाच्या शिस्तपालन समितीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे शिफारस केली आहे, त्यामुळे येत्य दोन दिवसांत प्रदेश काँग्रेस कमिटी याबाबतचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे लक्ष

दरम्यान, मेहुणे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तर भाचा सत्यजित तांबे यांच्यावर कारवाईची शिफारस करण्यात आलेली आहे. त्यानंतरही सत्यजित तांबे यांचे मामा आणि काँग्रेसचे विधीमंडळातील नेते बाळासाहेब थोरात यांनी या सर्व प्रकरणावर मौन बाळगून आहेत. त्यामुळे थोरात यांच्या भूमिकेकडे काँग्रेस पक्षासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT