Nashik Graduate Constituency : भाजपच्या धनंजय जाधव यांची माघार; माघारीपूर्वी सत्यजित तांबेंबाबत केले मोठे विधान

युवक काँग्रेसमध्ये असताना मी सत्यजित तांबे यांच्याबरोबर काम केले आहे. पक्षाने आदेश दिले तर तांबे यांना नगरमधून जास्तीत जास्त लीड कसं मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्न करू.
Satyajeet Tambe-Dhananjay Jadhav
Satyajeet Tambe-Dhananjay JadhavSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : नाशिक (Nashik) पदवीधर मतदासंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले भारतीय जनता पक्षाचे (BJP) पदाधिकारी धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) यांनी आज माघार (withdraw) घेतली. मात्र, माघार घेत असतानाच त्यांनी मोठे विधान केले आहे. ‘नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजप सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना पाठिंबा देऊ शकतो, त्यांच्या लीडसाठी आम्ही प्रयत्न करू,’ असे जाधव यांनी म्हटले आहे. (BJP's Dhananjay Jadhav withdraws from Nashik graduate constituency)

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे निरीक्षक ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार मी माझा उमेदवारी अर्ज पक्षासाठी मागे घेत आहे, असे सांगून जाधव म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी युवा चेहरा पाहिजे म्हणून मी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी समोरून जे उमेदवार दिले जात होते, ते चार टर्म आमदार होते. पदवीधराचे प्रश्न समजून ते सोडविण्याचे काम एक युवा कार्यकर्ताच करू शकतो, असे मला वाटले त्यामुळे मी उमेदवारी अर्ज भरला होता.

Satyajeet Tambe-Dhananjay Jadhav
Mangaldas Bandal News : मंगलदास बांदलांना जेलवारी घडविणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल

खासदार सुजय विखे पाटील यांनी माझ्या उमेदवारीसाठी मोठे प्रयत्न केले. माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवून प्रयत्न केले, हेच माझ्यासाठी मोठे होते. भविष्यात मला सुजय विखे पाटील आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोठी संधी मिळेल. पदवीधर युवकांचे जे प्रश्न आहेत, ते पक्षाच्या माध्यमातून सोडविण्याचे माझे काम चालूच राहणार आहे, असेही जाधव यांनी म्हटले आहे.

Satyajeet Tambe-Dhananjay Jadhav
Pune News : राष्ट्रवादीने भाजपला पुन्हा डिवचले : पुण्यात पुन्हा ‘स्वराज्य रक्षक संभाजी महाराज’ अशी बॅनरबाजी

भारतीय जनता पक्ष ज्या उमेदवाराला पाठिंबा देईल, त्यांच्यासाठी मी, माझ्या संघटना आणि पदाधिकारी काम करणार आहोत. भाजप ज्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे, तोच नाशिक पदवीधर मतदारसंघाचा आमदार असणार आहे, असेही सूतोवाच जाधव यांनी केले.

Satyajeet Tambe-Dhananjay Jadhav
Sudhir Tambe : निलंबनाच्या कारवाईनंतर सुधीर तांबेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

जाधव म्हणाले की, सत्यजित तांबे यांना भाजप पाठिंबा देऊ शकतो. तेही गेल्या अनेक वर्षांपासून संघटनेत काम करतात. भाजपचे श्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो आम्हाला कायमच मान्य असतो. युवक काँग्रेसमध्ये असताना मी सत्यजित तांबे यांच्याबरोबर काम केले आहे. पक्षाने आदेश दिले तर तांबे यांना नगरमधून जास्तीत जास्त लीड कसं मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्न करू.

Satyajeet Tambe-Dhananjay Jadhav
Satyajit Tambe News : काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अन् भाजपही विरोधात गेली तरी सत्यजीत तांबेंच बाजी मारणार?

शुभांगी पाटील आणि धनराज विसपुते हे दोघेही भाजपकडून इच्छूक होते. पण पाटील यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे, त्यामुळे त्या निवडणूक लढवतील, असे वाटते. धनराज विसपुते यांनीही अद्याप माघार घेतलेली नाही. पण मी पक्षाला मानणारा कार्यकर्ता आहे. जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या नगरमधील मी कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी श्रद्धा आणि सबुरी मानणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे भविष्यात मला पक्षाकडून संधी मिळेल, असा विश्वास वाटतो, असे जाधव यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com