Mumbai, 13 June : अन्न व प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी कारवाईचा मोठा धडाका लावला आहे. मुंडेंच्या धडक कारवाईमुळे भेसळ माफियांचे धाबे दणाणले आहेत. त्याचपद्धतीने गुटखा उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांवर मकोकाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या धडाकेबाज कारवाईनंतर राज्याच्या वरिष्ठ मंत्र्याने आयुक्त मुंडे यांना फोन करून आणखी कडक कारवाई करण्याची सूचना केली आहे.
माध्यमांशी बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अन्न व प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाईचे समर्थन केले आहे. तसेच, आणखी कडक कारवाई करण्याबाबत सूचित केले आहे.
मंत्री भुजबळ म्हणाले, अन्न व प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे जी धडक कारवाई करत आहेत, ती चांगली गोष्ट आहे. अन्न, दूध, खायचे आणि पिण्याचे पदार्थ आहेत, या सर्वांमध्ये सर्रास भेसळ होते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे.
मी तर स्वतःच तुकाराम मुंडे यांना फोन करून सांगितलं की, बाबा ह्या मुंबईमध्ये जे दूध आहे, ते मूळचे दूध इंजेक्शनच्या साहाय्याने काढून घेतात आणि त्यात पाणी टाकतात. तेही घाणेरडं पाणी टाकली जातं. त्यामध्ये अनेक वेळा केमिकल्स असतं, त्यामुळे किडन्यांचे रोग वाढतात, असे छगन भुजबळ यांनी नमूद केले.
मुलाबाळांचं तर आयुष्यच उद्ध्वस्त होतंय. म्हणून तुम्ही ह्याच्यावर जास्त जोर द्या. जेवढी कडक कारवाई करता येईल, तेवढी ती करा, असं मी आयुक्त तुकाराम मुंडे यांना सांगितलं आहे, असा दावा छगन भुजबळ यांंनी केला.
ते म्हणाले, अन्नधान्य, औषधांमध्ये भेसळ करणाऱ्यांना अतिशय कडक मकोका लावायचा असेल तर तोही लावला पाहिजे. तुम्ही अनपेक्षितरित्या तुम्हाला माहिती असतानासुद्धा खोटी औषधे, भेसळ देऊन लोकांचे जीव घेता. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई आवश्यकच आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.