NCP SP MLA : भाजपला पाठिंबा देऊन पवारांचा आमदार एकनाथ शिंदेंच्या भेटीला; चर्चेला उधाण

Uttam Jankar Meet Eknath Shinde : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.
Eknath Shinde-Uttam Jankar
Eknath Shinde-Uttam JankarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 13 June : विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा देणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी आज (ता. १३ जून) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे आमदार जानकर यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारपासून (ता. १२ जून) सातारा जिल्ह्यातील दरे गावी आले आहेत. त्या ठिकाणी जाऊन आमदार जानकर यांनी शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. भाजपला पाठिंबा देऊन पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेल्याने एकच चर्चा रंगली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढविणारे भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी पाठिंबा दिला आहे. पाठिंबा देताना जानकर यांनी मोहिते पाटील यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे, त्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दरे गावी गेले होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंद दाराआड जानकर यांनी चर्चा केली. चर्चेचा तपशील समजू शकला नसला तरी विधान परिषद निवडणूक व निधीबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Eknath Shinde-Uttam Jankar
Shivsena Leader Statement : शिवसेना नेत्याचे खळबळजनक स्टेटमेंट : ‘अजितदादांप्रमाणे एकनाथ शिंदेंचाही घात होऊ शकतो’

एकनाथ शिंदेंच्या भेटीबाबत आमदार जानकर म्हणाले, भेटीचं कारण काहीच नाही. त्यांना नेहमीच भेटतो. मतदारसंघात निधीची गरज लागते, त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीची गरज लागते.

सोलापुरात आम्ही भाजप उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे. आमच्याकडं संख्याबळ नव्हतं आणि फार टोकाची कटुता घ्यावी, अशी परिस्थिती सोलापूरच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत नव्हती, असे स्पष्टीकरण आमदार उत्तम जानकर यांनी विधान परिषद निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याच्या मुद्यावर दिले.

Eknath Shinde-Uttam Jankar
Vidhan Parishad Election : सातारा ZPचा वचपा विधानपरिषदेत?: शंभूराज देसाई अन् मकरंदआबांच्या अटीने भाजपला खिंडीत गाठलं

शिवसेनेचे नेते तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, उत्तम जानकर हे एकनाथ शिंदे यांचे चांगले मित्र आहेत. त्यांच्या विभागातील काही विकास कामांच्या प्रश्नासंदर्भात ते उपमुख्यमंत्री शिंदे यांना भेटायला आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com