Vidhan Parishad Election : सातारा ZPचा वचपा विधानपरिषदेत?: शंभूराज देसाई अन् मकरंदआबांच्या अटीने भाजपला खिंडीत गाठलं

Sangli-Satara Politic's : सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीपूर्वी महायुतीतील नाराजी पुन्हा समोर आली असून जिल्हा परिषद सत्तासमीकरणांवरून भाजपसमोर नवे राजकीय आव्हान उभे राहिले आहे.
Sangli-Satara Vidhan parishad Election-2026
Sangli-Satara Vidhan parishad Election-2026 Sarkarnama
Published on
Updated on

Satara, 13 June : सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील नाराजी पुन्हा उघड झाली आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील फोडाफोडीमुळे दुखावलेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने भाजपला खिंडीत पकडल्याचे दिसून येत आहे. कराडमधील महायुतीच्या समन्वय बैठकीला दोन्ही पक्षाने दांडी मारून नाराजी दाखवून दिली आहे. विधान परिषदेसाठी मतदान हवे असेल तर झेडपीतील सत्तेची अट दोन्ही पक्षांकडून ठेवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने साताऱ्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. भाजपकडून आज कराडमध्ये महायुतीच्या समन्वयाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला भाजपचे दोन्ही जिल्ह्यातील सर्व नेते झाडून उपस्थित होते. मात्र, महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. खुद्द पालकमंत्री शंभूराज देसाईही अनुपस्थित होते, त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नाराजीने पुन्हा उचल खाली आहे.

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेनेने जिल्हा परिषद निवडणुकीतील फोडाफोडीचा वचपा काढायचे ठरविल्याचे दिसून येत आहे. कारण, धैर्यशील कदम यांना आमच्या सदस्यांची मते हवे असतील तर झेडपीतील सत्तावाटपाची अट दोन्ही पक्षाकडून भाजपपुढे ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सव्वा वर्षे आम्हाला मिळावे. तसेच सभापतिपदाचे समसमान वाटप व्हावे, अशी अट शिवसेना-राष्ट्रवादीकडून भाजपपुढे ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने ‘सांगली सातारा’मध्ये नवा पेच निर्माण झाला आहे.

Sangli-Satara Vidhan parishad Election-2026
Mahayuti Dispute : साताऱ्यात मोठी घडामोड : महायुतीच्या बैठकीला मकरंदआबा, शंभूराज देसाईंची दांडी; भाजपवर राग कायम

या मतदारसंघात भाजपकडे ३१४ मतदार असून, त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस २०५, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ११९, शिवसेना १११, काँग्रेस ७३, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष १ असे राजकीय पक्षांचे संख्याबळ आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यात आघाड्या आणि अपक्षांची संख्याही लक्षणीय आहे, त्यामुळे या दोन्ही मित्रपक्षांच्या मदतीशिवाय भाजपचा विजय अशक्य आहे, त्यामुळे मित्रपक्षांच्या मागणीपुढे भाजपला झुकावे लागण्याची चिन्हे आहेत.

Sangli-Satara Vidhan parishad Election-2026
Sangli-Satara MLC : शिंदे-देसाई यांच्यात बंदखोलीत तासभर चर्चा; भाजपकडून डावलले जात असल्याने शिवसेना-राष्ट्रवादी नाराज

आमच्याकडे अशी कोणतीही अट आलेली नाही : शिवेंद्रसिंहराजे

शिवसेना-राष्ट्रवादीच्या अटीबाबत भाजप नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, झेडपीतील सत्ता वाटपाची अट अजून आमच्याकडे आलेली नाही. महायुतीमध्ये अशा कोणत्याही अटी व शर्ती नाहीत. आम्ही सर्व एकत्र असून अशा काही मागण्या असल्या तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून निर्णय होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com