Sharad Pawar News sarkarnama
विशेष

शरद पवारांनी उलगडले आपल्या राजकीय डावपेचाचे गूढ!

राजकारणात डाव कुठला टाकायचा, हे मी कुस्तीतून शिकलो : शरद पवार

सरकारनामा ब्यूरो

शिरूर : कुस्तीगीर परिषदेशी माझा संबंध जुना आहे. मी या संघटेनेचा गेली अनेक वर्षे अध्यक्ष आहे. हा खेळ पुरातन काळापासून या देशातील सामान्य माणसांनी जपला आहे. मी अनेक खेळाच्या संघटनेमध्ये आहे. राजकारण एका बाजूला आणि क्रीडा क्षेत्र एका बाजूला. राजकारणात असूनही क्रीडा क्षेत्रात कधी राजकारण आणलं नाही. मात्र, राजकारणात डाव कुठला टाकायचा, हे मी कुस्तीतून शिकलो आहे, अशी गुगली ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोमवारी शिरूरमध्ये टाकली. (Sharad Pawar unravels the mystery of his political maneuver!)

शिरूरचे माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल यांच्या वाढदिवसानिमित्त निकाली कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या मैदानाला भेट दिल्यानंतर पवार बोलत होते. ते म्हणाले की, आजचा दिवस आनंदाचा आहे, त्याची दोन कारणे आहेत. हे मैदान ज्या ठिकाणी होते, त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे. ही कुस्ती स्पर्धा आमचे मित्र रसिकलाल धारिवाल यांचे चिरंजीव प्रकाश धारिवाल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केली आहे. मात्र, मी प्रकाश धारिवाल यांच्यावर थोडासा नाराज आहे. कारण ते बोलताना म्हणाले की पवारसाहेब या वयातसुद्धा...मी काय म्हातारा झालो नाही, असे सांगत पवार यांनी धारिवाल यांची फिरकी घेतली. (Sharad Pawar News updates)

आज जरा गंमतीची परिस्थिती आहे. वाढदिवस प्रकाश धारिवाल यांचा आहे. आयोजक निमंत्रक आहेत महाराष्ट्र केसरी रघुनाथदादा पवार, आयोजक अशोक पवार आणि स्थानिक आमदार तेही पवार, प्रमुख पाहुणे शरद पवार, असे सांगून शरद पवार म्हणाले की, कुस्ती हा सामन्य कुटुंबातील, मेहनती लोकांचे क्षेत्र आहे. महाराष्ट्राने आजपर्यंत कुस्तीला नेहमीच पाठिंबा दिलेला आहे. या संघटेनेला राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई यांचे आशीर्वाद होते. गेल्या काही वर्षांपासून या संघटनेची धुरा माझ्या खांद्यावर आहे. जमेल त्या ठिकाणी जाण्याचा मी प्रयत्न केला आहे, असेही पवार यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT