Dr Subramanian Swamy
Dr Subramanian Swamy Sarkarnama
विशेष

भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे मोठे विधान : ‘महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक’

सरकारनामा ब्यूरो

पंढरपूर : महाराष्ट्रात सत्तेवर आलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde)-देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार अनैतिक आहे, त्यांचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे, अशी टिप्पणी भारतीय जनता पक्षाचे (BJP) माजी खासदार तथा ज्येष्ठ नेते डॉ सुब्रमण्यम स्वामी (Dr Subramaniam Swamy) यांनी केले आहे. भाजप नेत्यानेच शिंदे-फडणवीस सरकार हे नैतिक नसल्याचे म्हटल्याने विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर शिक्कामोर्तब झाले आहे. (Shinde-Fadnavis government in Maharashtra is unethical : Dr Subramanian Swamy)

पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार मुक्त करण्याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी आज (ता. २४ डिसेंबर) पंढरपूरमध्ये आले होते. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या विधानामुळे सरकारच्या नैतिकतेबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडून भाजपच्या सहकार्याने राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर शिवसेनेने शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरवावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याबाबतचा निर्णय अजून प्रलंबित आहे. त्या अनुषंगाने बोलताना डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सरकार नैतिक नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, डॉ. स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदुत्ववादी नाहीत, असे धक्कादायक विधान डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. त्या पुष्ट्यार्थ बोलताना स्वामी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते चर्च सरकारीकरण केले का? १९४७ नंतर कोणतेही चर्च अथवा मशीद ताब्यात घेतली नाही. मग हिंदूंनी कोणते पाप केले आहे.

मोदी हिंदुत्ववादी नाहीत. त्यांनी उत्तराखंडमध्ये अनेक मंदिरे सरकारीकरण केली आहेत. न्यायालयात जाऊन ती मी मुक्त करणार आहे. मी भाजपच्या जाहीरनाम्यानुसार काम करणार आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसे नाहीत. जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटविण्यासाठी मी अमित शहा यांना मार्गदर्शन केले, असा दावाही स्वामी यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT