Shweta Mahale-Manda Mhatre-Praveen Darekar Sarkarnama
विशेष

BJP's Bhiwandi workshop : भाजपचे तीन आमदार लिफ्टमध्ये अडकले; गिरीश महाजन मदतीला आले...

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन त्यांच्या मदतीला धावले आणि त्यांनी या तीन आमदारांची लिफ्टमधून सुटका केली.

सरकारनामा ब्यूरो

BJP News : भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय कार्यशाळा भिवंडीत सुरू आहे. राज्यातील आमदार, खासदार आणि प्रमुख नेतेमंडळी या कार्यशाळेला उपस्थित आहेत. त्यात सहभागी झालेले भाजपचे तीन आमदार लिफ्टमध्ये अडकले होते. त्यामध्ये आमदार प्रवीण दरेकर, मंदा म्हात्रे आणि श्वेता महाले यांचा समावेश होता. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन त्यांच्या मदतीला धावले आणि त्यांनी या तीन आमदारांची लिफ्टमधून सुटका केली. (Three BJP MLAs got stuck in the lift)

भारतीय जनता पक्षाने (BJP) महाविजय-२०२४ अभियान हाती घेतले आहे. या अभियानाच्या माध्यमातून भाजपने राज्यात १५२ जागा जिंकण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे. त्यासाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा भिवंडीतील (Bhiwandi) साया ग्रॅंड क्लब येथे आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यशाळाला आलेले तीन आमदार हे लिफ्टमध्ये अडकले हेाते.

भिवंडीत त्या राज्यस्तरीय कार्यशाळेला राज्यातील भाजपचे सर्व आमदार-खासदार आणि प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होती. त्यात प्रवीण दरेकर, मंदा म्हात्रे, श्वेता महालेही आले होते. हे तीन आमदार लिफ्ट अकडले होते. आमदार मंदा म्हात्रे यांना लिफ्टमध्ये बराच वेळ अडकल्याने अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यावेळी प्रविण दरेकर यांनी त्यांना आधार दिला.

दरम्यान, भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन या तीन आमदारांच्या मदतीला गेले. त्यांनी लिफ्टचा दरवाजा वाकवत दरेकर, म्हात्रे आणि महाले यांना बाहेर काढले, त्यामुळे या तीनही आमदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

या कार्यशाळेतून भाजपने राज्यात विधानसभेसाठी १५२ प्लसचा नाराचा दिला आहे, तर लोकसभेला ३५० जागा जिंकण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचे ठरविण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT