Vasantrao Kale Sugar Factory Election
Vasantrao Kale Sugar Factory Election Sarkarnama
विशेष

NCP NEWS : वसंतराव काळे कारखान्याची निवडणूक शरद पवारांच्या कोर्टात : मुंबईतील बैठकीकडे लक्ष

भारत नागणे

पंढरपूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘वसंतराव काळे साखर कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घालून बिनविरोध करावी,‘ अशी विनंती कारखान्याचे अध्यक्ष काल्याणराव काळे यांनी केली आहे. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी पाच जूनपूर्वी अभिजीत पाटील, कल्याणराव काळे, युवराज पाटील, भगिरथ भालके, गणेश पाटील यांच्या समवेत बैठक होणार आहे. यात पवार कोणता निर्णय देतात, यावरही बरीच राजकीय गणितं अवलंबून राहणार आहेत. (Vasantrao Kale Sugar Factory election in Pawar's court: Attention to the meeting before 5th June)

पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या (Sugar Factory) निवडणुकीत (Election) अभिजित पाटील यांनी भाग घेऊ नये, ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहेत. पक्षातील पदाधिकाऱ्यांनी एकमेकांविरोधात लढणं बरं दिसत नाही. हे मुद्दे घेऊन काळे पवारांना सोलापुरात येऊन भेटले होते. त्यावेळी पवारांनी विठ्ठल परिवाराची मुंबईत बैठक आयोजित केली हेाती. मात्र, त्या बैठकीत कारखान्याच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली नव्हती.

दरम्यान, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील आणि प्रा. पी. बी. रोंगे यांच्या गटाकडून आज मिरवणुकीने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे कारखान्याची निवडणूक लागणार, हे आता स्पष्ट झाले आहे. मात्र, पवारांनी पाच जूनपूर्वी बैठक बोलावली असल्याने त्या बैठकीत काय ठरतंय, याकडे पंढरपूरचे लक्ष असणार आहे.

सहकार शिरोमणी कारखाना निवडणुकीसंदर्भात मुंबईत एक बैठकही झाली. त्यामध्ये बिनविरोध कोणतीच चर्चा झाली नाही. पुन्हा यावर चर्चा करण्यासाठी पाच जूनपूर्वी अभिजीत पाटील, कल्याणराव काळे, युवराज पाटील, भगीरथ भालके, गणेश पाटील यांच्या समवेत बैठक होणार आहे. यामध्ये शरद पवार कोणता निर्णय देतात, यावरही बरेच राजकीय गणितं अवलंबून राहणार आहेत.

दुसरीकडे, कोणत्याही परिस्थितीमध्ये वसंतराव काळे साखर कारखान्याची निवडणूक लढवणारच, अशी भूमिका अभिजीत पाटील यांनी घेतली आहे. तसे शरद पवार यांना आपण भेटून सांगितले असल्याचेही पाटील यांनी आज स्पष्ट केले. पाटील यांनी घेतलेली भूमिका कायम राहिली, तर कारखान्याची निवडणूक अटळ मानली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT