Mahayuti Vs MVA Sarkarnama
विशेष

Vidhansabha Election : प्री-पोल सर्व्हेत कोणाचे पारडे जड; महायुती की महाविकास आघाडी बाजी मारणार ?

Political News : उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी केवळ दोनच दिवसाचा अवधी उरला असतानाच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2024 साठी ग्राउंड झिरो मेगा प्री-पोलचा सर्व्हे समोर आला आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरु आहे. सर्वच पक्षाने विजयासाठी कंबर कसली आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी केवळ दोनच दिवसाचा अवधी उरला आहे. सर्वच पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली असून त्यांची मनधरणी केली जात असतानाच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2024 साठी ग्राउंड झिरो मेगा प्री-पोलचा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीचे पारडे जड असल्याचे समोर आले आहे.

चार महिन्यापुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने मोठा विजय मिळवला होता. राज्यातील 48 पैकी 30 जागा महाविकास आघाडीच्या पदरात पडल्या होत्या तर महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी (MVA) बाजी मारेल असा प्री-पोलचा सर्व्हेमध्ये समोर आले आहे. (Vidhansabha Election news)

राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या काळात विधानसभा निवडणूक-2024 साठी ग्राउंड झिरो मेगा प्री-पोलचा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला तब्बल 157 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी महायुतीला केवळ 117 जागा मिळणार असल्याचा अंदाज या सर्व्हेमधून वर्तविण्यात आला आहे.

महायुतीत पुन्हा एकदा सर्वांधिक जागा भाजपला (Bjp) मिळण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे. भाजपला 79 जागा मिळतील असा दावा या सर्व्हेतून करण्यात आला आहे. महायुतीमध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असून त्यांना विधानसभा 2024 च्या निवडणुकीत केवळ 23 जागा मिळणार असल्याचे अंदाज पुढे आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 14 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

लोकसभेप्रमाणेच या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसला 68 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 44 आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला 41 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यासोबतच महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनाही 4 जागा मिळण्याची शक्यता या सर्व्हेमधून दिसत आहे.

या सर्व्हेनुसार मविआला 157 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यामध्ये काँग्रेसला 68, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 44, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला 41, समाजवादी पक्षाला 1, सीपीआय-एम 1, पीडब्ल्यूपी 2 जागा मिळतील असा अंदाज या सर्व्हेतून वर्तविण्यात आला आहे.

या सर्व्हेत महायुतीला एकूण 117 जागा मिळतील असा अंदाज आहे. महायुतीमध्ये भाजपला 79, शिवसेना (शिंदे गट) 23, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 14 जागा तर इतर पक्षाला एक जागा मिळेल असा अंदाज आहे. तर अपक्ष व इतर पक्षांना 14 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजाकडे लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT