Arvind Sawant News : खासदार सावंतांच्या अडचणीत वाढ; शायना एनसींच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Political News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मुंबादेवीतील उमेदवार शायना एनसी यांच्याविरोधात अरविंद सावंत यांनी आक्षेपार्ह टीका केली होती. शायना एनसी यांच्या तक्रारीवर खासदार सावंत यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Arvind Sawant, shaina nc
Arvind Sawant, shaina nc Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात मुंबईतील नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे येत्या काळात खासदार सावंत यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मुंबादेवीतील उमेदवार शायना एनसी यांच्याविरोधात त्यांनी आक्षेपार्ह टीका केली होती. शायना एनसी यांच्या तक्रारीवर खासदार सावंत यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भारतीय न्याय संहिता कलम 79 आणि कलम 356 (2) अंतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी 'इम्पोर्टेड माल नहीं चलेगा, ओरिजनल चलेगा', असे विधान सावंत यांनी केले होते. त्यानुसार नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'खासदार अरविंद सावंत महिलांचा मान राखा आणि माफी मागा' अशी मागणी करत शिवसेनेनेच्या (Shivsena) उमेदवार शायना एनसी या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

शायना एनसी यांना अरविंद सावंत यांनी अप्रत्यक्षपणे माल असे म्हटले आहे. त्यावर शायना एनसी यांनी अरविंद सावंत यांचा समाचार घेतला घेत त्यांना सुनावले आहे. एखाद्या स्त्रीला माल शब्द वापरणे म्हणजे तिचा अपमान करणं आहे. जे उद्धव ठाकरे गटाचे नेते करीत आहेत. माल बोलल्याने तुम्हीच आता बेहाल होणार आहात, अशा शब्दात शायना एनसी यांनी सावंतांना खडेबोल सुनावले होते.

Arvind Sawant, shaina nc
Maharashtra Assembly Election: नात्यात राजकारण..! 'आमदारकी'साठी कुठे पती-पत्नी तर कुठे बाप-लेक झुंजणार

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर सत्ताधारी नेतेमंडळींकडून खासदार सावंत यांच्यावर टीका केली जात आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेनेच्या उमेदवार शायना एनसी या खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यांनतर ठाण्यात अरविंद सावंत यांच्या विरोधात FIF दाखल करण्यात आली आहे.

Arvind Sawant, shaina nc
Satej Patil News : आर. आर. पाटलांनी केलेली सही दाखवणे म्हणजे गोपनीयतेचा भंग; सतेज पाटलांची टीका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com