Shivsena News: धाराशिवमध्ये भाजपमधून आलेल्या नेत्यास उमेदवारी; शिवसेना पदाधिकारी बंडाच्या पवित्र्यात

Politcal News : धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यामुळेच आमच्यावर अन्याय झाला असल्याची भावना व्यक्त करीत शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे आक्रमक झाले आहेत.
Tanaji Sawant News
Tanaji Sawant NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. धाराशिव जिल्ह्यातील महाविकास आघाडी व महायुतीचे उमेदवार ठरले आहेत. त्यानंतर आघाडी व महायुतीमधील नाराजी उफाळून आली आहे. त्यामुळे चारही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज कोण माघार घेणार याकडे लागून राहिले आहे. त्यातच धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यामुळेच आमच्यावर अन्याय झाला असल्याची भावना व्यक्त करीत शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे आक्रमक झाले आहेत.

महायुतीकडून उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आला होता. त्यामध्ये शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांना उमेदवारी न देता अचानक भाजपसोडून शिवसेनेत प्रवेश केलेल्या अजित पिंगळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पिंगळे यांना उमेदवारी दिल्याने शिवसेना पदाधिकारी नाराज झाले असून त्यांनी बंडाची भूमिका घेतली आहे. (Shivsena News)

शिवसेना (Shivsena) जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांच्यासह शिवाजी कापसे आणि सुधीर पाटील या शिवसेना शिंदे गटाच्या प्रमुख उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यासोबतच ही मंडळी उमेदवारीवर ठाम आहेत. त्यामुळे या सर्वांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या विरोधात धाराशीवचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे आक्रमक झाले आहेत. तानाजी सावंत यांना गद्दार, खेकडा, खोकेवाला म्हटल्यावर पहिल्यांदा मी धावून गेलो होतो. पण माझ्यावर अन्याय झाल्याची भावना साळुंखे यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता तानाजी सावंत यांच्याशी संवाद संपला असल्याची भूमिका शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांनी घेतलीय आहे. त्यामुळे आता या शिवसेना नेत्याची नाराजी पालकमंत्री स्वनात कशी दूर करणार याकडे लक्ष लागले आहे.

Tanaji Sawant News
Shivsena News : शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली; माजी मंत्री सतेज पाटलांचे गंभीर आरोप

माजी मंत्री तानाजी सावंत यांनीच शिवसेनेवर अन्याय केल्याची भावना सुरज साळुंखे यांनी व्यक्त आहे. तानाजी सावंत यांना खेकडा, गद्दार म्हणल्यावर मी धावून गेलो मात्र आज अन्याय झाला. यापुढे तानाजी सावंत यांच्याशी संवाद संपल्याचाही साळुंखे म्हणाले. तसेच शिवसैनिकांसाठी लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघातून अनेकजण इच्छुक होते. मात्र, भाजपच्या अजित पिंगळे यांना शिवसेना शिंदे गटाकडून धाराशिवची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं अनेकजण नाराज आहेत. स्वत: तानाजी सावंत यांचे पुतणे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्याचबरोबर जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे देखील इच्छुक होते. मात्र, शिवसेना शिंदे गटाकडून अजित पिंगळे यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. आता धाराशीवची लढत ही कैलास पाटील विरुद्ध अजित पिंगळे असी होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कैलास पाटील हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

या मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असाच सामना होणार आहे. मात्र, अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. अर्ज माघार घेण्याची तारीख ही 4 नोव्हेंबर आहे. त्यामुळं 4 नोव्हेंबरनंतरच मतदारसंघातील खरे चित्र स्पष्ट होणार आहे. याठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कैलास पाटील हे आमदार आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठी चुरस पहावयास मिळत आहे.

Tanaji Sawant News
Arvind Sawant News : खासदार सावंतांच्या अडचणीत वाढ; शायना एनसींच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com