Vinay Sahasrabuddhe-Eknath Shinde-Ajit Pawar-Devendra Fadnavis Sarkarnama
विशेष

Vinay Sahasrabuddhe : महायुतीकडून निष्ठावंतांना न्याय; शिंदे, पवारांनंतर भाजपतील ज्येष्ठांना मंत्रिपदाचा दर्जा

Mahayuti News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून निष्ठावंत खूश करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 14 October : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून निष्ठावंत खूश करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून काही दिवसांपूर्वी महामंडळाचे वाटप केले आहे, शिवाय अजित पवारांनीही आपल्या जुन्या नेत्याला संधी दिली आहे.

आता भाजपकडूनही ज्येष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडे असलेल्या पदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे, त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर निष्ठावंतांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न महायुतीकडून सुरू आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धे (Vinay Sahasrabuddhe) हे राज्य सांस्कृतिक धोरण अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यातून भाजपने निष्ठावंतांना निवडणुकीच्या तोंडावर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सहस्त्रबुद्धे हे आता तीन वर्षे समितीचे अध्यक्ष असणार आहेत. सहस्त्रबुद्धे यांना याअगोदर पक्षाकडून राज्यसभेवर संधी देण्यात आली होती.

दरम्यान, आमचे वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री (CM), दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना (Deputy CM) धन्यवाद देतो. धोरणाची आखणी केली जाते. मात्र धोरणाची अमंलबजावणी होत नाही. या सरकारने दूरदर्शीपणे धोरण आखणी, ज्या माध्यमातून, लोकांच्या सहभागातून झाली. त्यांना आता हे शिवधुनष्य पेलायला सांगितले आहे की, तुम्ही आता धोरण अंमलात आणून दाखवा. त्यामुळे हे काम आव्हानात्मक आहे.

सरकारमधील अधिकारी, विशेषत सुधीर मुनंगटीवार यांच्यामुळे हे घडून आलेले आहे. या सर्वांच्या सहकार्यातून धोरण आखणीइतकेच अंमलबजावणीचे कामही सुखर आणि प्रभावी होईल, असे सहस्त्रबुद्धे यांनी राज्यमंत्रिपदाची दर्जा मिळाल्यानंतर सांगितले.

एकनाथ शिंदेंकडून कोणाला संधी?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारमधील पक्षांकडून आपल्या जुन्या आणि जाणत्या नेत्यांना न्याय देण्याचे काम केले जात आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले आमदार संजय शिरसाट, आमदार भरत गोगावले, माजी खासदार हेमंत पाटील यांना महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपद हुकलेले संजय शिरसाट यांना सिडको, भरत गोगावले यांना एसटी महामंडळाचे, तर माजी खासदार हेमंत पाटील यांना हिंगोली येथे स्थापन करण्यात आलेले हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष करण्यात आले आहे, त्यामुळे मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्या निष्ठावंतांना पदे देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

अजितदादांकडून कोणाला न्याय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना राज्य सहकार परिषदेचे अध्यक्षपद देण्यात आलेले आहे. या परिषदेच्या अध्यक्षालाही राज्यमंत्रिपदाची दर्जा देण्यात आलेला आहे. याचबरोबर रुपाली चाकणकर यांच्याकडे राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपदही कायम ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT