Vinod Tawde Sarkarnama
विशेष

Vinod Tawde : भाजप हायकमांडने विनोद तावडेंवर पुन्हा एकदा सोपवली महत्वपूर्ण जबाबदारी

Vijaykumar Dudhale

Mumbai, 17 August : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी आणखी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जबाबदारीला विशेष महत्त्व आहे. भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या प्रमुखपदी विनोद तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आगामी काळात देशात चार राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका (Assembly Election) होऊ घातल्या आहेत. यामध्ये हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रमही निवडणूक आयोगाने जाहीर झाला आहे. याचबरोबर महाराष्ट्र (Maharashtra) आणि झारखंड विधानसभा मतदारसंघाची निवडणूकही होणार आहे. त्यामुळे भाजपने (BJP) संघटनात्मक बांधणीचा निर्णय पुन्हा एकदा घेतला आहे.

चार राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने सदस्य नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या अभियानाच्या प्रमुखपदाची जबाबदारी भाजप पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यावर सोपवली आहे. तावडे यांच्यावर पक्षाकडून आधीच महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत.

महाराष्ट्रासह चार राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या चार राज्यांत सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे, त्यासाठीच भाजपकडून सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे.

हे अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी पक्षाने विनोद तावडे यांच्यावर सोपवली आहे. आता विनोद तावडे भाजपच्या सदस्यांचा आकडा कुठपर्यंत नेतात, याबाबतची उत्सुकता असणार आहे.

विनोद तावडे यांच्यावर पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी अगोदरच आहे. त्याचबरोबर बिहारसारख्या राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या राज्याचे प्रभारीपदही तावडे यांच्याकडेच सोपवण्यात आलेले आहे, त्यामुळे दिल्लीच्या वर्तुळात दिवसेंदिवस महत्व वाढवत नेणाऱ्या विनोद तावडे यांच्याकडे भाजपने सदस्य नोंदणी अभियानाचे प्रमुखपद सोपवून त्यांच्यावरील विश्वास आणखी वृद्धींगत केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT