Sharad Pawar : विधानसभा निवडणूक जाहीर न होण्याबाबत शरद पवारांचे प्रथमच भाष्य; मोदींवर साधला निशाणा

Maharashtra assembly election 2024 : ‘एक देश, एक निवडणूक' याचा पुरस्कार करणारे मोदी सरकार मात्र आता बदलले आहे. याचे कारण काय हे मला माहिती नाही. जम्मू काश्मीर आणि हरियाणासोबत महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक जाहीर होणे अपेक्षित होते. तसे झाले नाही.
Sharad Pawar-Narendra Modi
Sharad Pawar-Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 17 August : ‘एक देश, एक निवडणूक' याचा पुरस्कार करणारे मोदी सरकार मात्र आता बदलले आहे. याचे कारण काय हे मला माहिती नाही. जम्मू काश्मीर आणि हरियाणासोबत महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक जाहीर होणे अपेक्षित होते. तसे झाले नाही. पंतप्रधान मोदी यांचा महाराष्ट्राबाबतचा कल एक प्रकारचा विरोधाभास असल्याचे सांगून शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

सार्थक फाउंडेशनच्या पुरस्कार समारंभासाठी शरद पवार (Sharad Pawar) आज नागपूरला (Nagpur) आहे होते. त्यांनी अवघे दोन ते तीन मिनिटे पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी बांगलादेशात घडलेल्या घडामोडींचाही उल्लेख करून नाशिकच्या दंगलीवरून राज्य सरकारला सावधगिरीचा इशारा दिला.

बांगलादेशात (Bangladesh) सत्ता परिवर्तनासाठी संघर्ष झाला आहे. सत्ता परिवर्तनासाठी उठाव केला गेला आहे. त्यातील काही गोष्टींची प्रतिक्रिया भारतात काही ठिकाणी उमटत आहे. बांगलादेशमध्ये जे घडले त्याचे परिणाम महाराष्ट्रातून दिसतील, असे काही वाटले नव्हते. त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही.

Sharad Pawar-Narendra Modi
Vanchit Youth Aghadi : प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय; ‘वंचित’ची सोलापूर जिल्हा युवा कार्यकारिणी बरखास्त

मात्र, महाराष्ट्रात काही ठिकाणी जे काही घडले ते राज्याच्या आणि समाजाच्या हिताचे नाही. महाराष्ट्राला आज शांततेची गरज आहे. त्यासाठी राजकारण्यांनी समाजकार्याने संयमाचा पुरस्कार करावा. याबद्दलची खबरदारी घ्यावी, असा सल्लाही शरद पवार यांनी दिला.

सरकारची भूमिका आणि गृह खात्याची जबाबदारी यावर भाष्य करता येईल. बांगलादेशमध्ये जे घडले त्याचे परिणाम घडण्याचे काही कारण होतं. अन्य देशांत घडलेल्या गोष्टींसाठी आपल्या देशातील सर्वसामान्य लोकांचे जीवन उद्‌ध्वस्त होईल किंवा ते संकटातील सापडतील, असे काही करू नये, अशा शब्दांत नाशिकच्या दंगलीवर शरद पवार यांना राज्य सरकारचे कान टोचले.

Sharad Pawar-Narendra Modi
Uddhav Thackeray CM : मुख्यमंत्रिपदावरून दानवेंचे काँग्रेसला चॅलेंज; ठाकरेंना विरोध असल्याचे जाहीर करण्याचे आव्हान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com