Samarjeet Ghatge Sarkarnama
विशेष

Samarjitsinh Ghatge : 'समरजितसिंह घाटगेंना आम्ही मुख्यमंत्री करू..!'; शरद पवार गटात दाखल होण्यापूर्वीच कोणी केलं मोठं विधान ?

Political News : येत्या काळात तुतारी चिन्हावर समरजितसिंह घाटगेंचा विजय निश्चित आहे. येत्या काळात माझ्यासहित सर्व महिला त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतील, अशी प्रतिक्रया एका महिला पदाधिकाऱ्याने 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केली.

Sachin Waghmare

Kolhapur News : कागल येथील नेते समरजीतसिंह घाटगे यांनी तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांचा विजय तुतारी हातात घेण्यापूर्वीच निश्चित झाला आहे. आजपर्यंत भाजपच्या माध्यमातून आम्ही समाजकारण केले. त्यामुळे येत्या काळात तुतारी चिन्हावर त्यांचा विजय निश्चित आहे. येत्या काळात माझ्यासहित सर्व महिला त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतील, अशी प्रतिक्रया एका महिला पदाधिकाऱ्यानी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केली.

गेली कित्येक वर्ष भाजपने त्यांना कसलीच संधी दिली नाही. त्यामुळे त्यांनी भाजपसोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे काही जणांनी सांगितले.

समरजितसिंह घाटगे (Samarjitsinh Ghatge) यांचे मतदारसंघात गेल्या अनेक दिवसापासून काम सुरु आहे. ते प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुख-दुखात सहभागी होतात. मतदारसंघातील विकासाची कामे करण्यावर त्यांचा आजपर्यंत भर राहिला आहे. येत्या काळात ते आमदार झाले तर कोल्हापूर जिल्ह्याचा कायापालट करतील. त्यामुळे मतदारसंघातील सर्वांनाच ते आमदार व्हावेत, असे वाटतात, अशी प्रतिक्रिया एका कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

कागल मतदारसंघाचे नेतृत्व करण्यास समरजितसिंह घाटगे तयार असून मतदार त्यांच्या पाठीशी उभे राहतील. जनतेचा कौल हा आमच्यासोबतच असणार असल्याने ते विजयी होतील. गेल्या आठ वर्षांपासून आम्ही पाहत आहोत.

त्यांनी भाजपचे काम करण्यास सुरुवात केले त्यावेळेसपासून त्यांनी कसलीच पदाची अपेक्षा न करता काम सुरु केले होते. कागल तालुक्यात त्यांनी अनेक विकास कामे करीत मतदारसंघाला प्रगतीपथावर नेले. गेल्या आठ वर्षांत विरोधकांनी जेवढे काम केले नाहीत, त्यापेक्षा अधिकचे काम त्यांनी केले असल्याची प्रतिक्रिया एका कार्यकर्त्यांने व्यक्त केली.

समरजितसिंह घाटगे यांनी जनतेसाठी काम केले आहे. त्यामुळे कागल तालुक्यातील जनता हीच मालक असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी जनतेचे पालक या नात्याने आजपर्यंत काम केले आहे. त्यामुळे ते जो निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य असणार आहे. त्यामुळे येत्या काळात समरजितसिंह घाटगे हे कागल मतदारसंघातून विधानसभेत पोचतील व भविष्यात ते राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारतील, असा विश्वास कागल तालुक्यातील त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT