SamarjitSinh Ghatge News: आधी संकेत, आता करुन दाखवलं; समरजितसिंह घाटगेंनी फेसबुकवरून भाजपचे चिन्ह हटवले

Kolhapur Mahayuti Politics : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना गुरु मानून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आपले राजकीय गुरू आहेत असे खुल्या व्यासपीठावरून घाटगे यांनी जगजाहीर सांगितले होते.
SamarjitSinh Ghatge.jpg
SamarjitSinh Ghatge.jpgSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला गळती लागण्यास सुरुवात झाली असून भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी देखील महायुतीच्या विरोधात बंड करण्याचे धोरण स्वीकारले आहे.

गेल्या आठवड्याभरापासून घाटगे हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. कार्यकर्त्यांसोबत घेण्यात येणाऱ्या मेळाव्यात याबाबत निर्णय होणार आहे. 23 ऑगस्ट रोजी हा मेळावा कागल येथे पार पडणार आहे. तत्पूर्वी समरजीत घाटगे (Samarjitsinh Ghatge) यांनी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम वॉल अकाउंट वरून भाजपचे चिन्ह हटवले आहे.

समरजीत घाटगे हे भाजपमध्ये सक्रिय झाल्यापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधत होते. राजे समरजितसिंह घाटगे या नावाने असणाऱ्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवरून गुरुवारी (ता.22) भाजपचे चिन्ह हटवून एक प्रकारे त्यांनी भाजपला राम राम ठोकल्याचे संकेत दिले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना गुरु मानून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आपले राजकीय गुरू आहेत असे खुल्या व्यासपीठावरून घाटगे यांनी जगजाहीर सांगितले होते. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण आणि भाजपच्या माध्यमातून केलेली विकास कामे ही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मतदार संघातून पोहोचवली होती. मात्र आज सायंकाळी त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या पेजवरून भाजपचे चिन्ह हटवले आहे.

SamarjitSinh Ghatge.jpg
Pune Criem News : धक्कादायक! बदलापूर घटनेची पुनरावृत्ती? पुणे जिल्ह्यात शिक्षकाकडून विद्यार्थिनींवर अत्याचार

उद्या घाटगे गटाचा मेळावा

शुक्रवारी होणाऱ्या मेळाव्यात घाटगे कोणता निर्णय घेणार याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा उद्या करणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपचे चिन्ह हटवल्यानंतर त्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे.

भाजपकडून मनधरणीचा प्रयत्न

कोणत्याही परिस्थितीत समरजित घाटगे यांनी भाजप सोडू नये अशी मागणी वरिष्ठ नेत्यांसह स्थानिक नेत्यांची आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, सत्यजित कदम यांनी घाटगे यांची भेट घेतली होती. मात्र, या भेटीत देखील ते आपण पक्ष सोडण्यावर ठाम असल्याचे घाटगे यांनी सांगितले होते.

SamarjitSinh Ghatge.jpg
Video Badlapur Rape Case : मोठी बातमी! बदलापूर प्रकरणानंतर सरकार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, गृह सचिवपदी 'हा' बडा अधिकारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com