Samarjitsinh Ghatge News : '231 मतांचा पराभव आजही खदखदतोय, तो झाला नव्हता केला होता'; घाटगेंच्या समोर थेटच सांगितले

Political News : कागलमधील भाजप नेते, समरजितसिंह घाटगे हे आज काय निर्णय घेणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. कार्यकर्त्यांनी समरजित घाटगे यांना 'राम कृष्ण हरी म्हणा आता घ्या हातात तुतारी', असे म्हणत साद घातली आहे.
Kolhapur News
Kolhapur News Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कागलमधील भाजप नेते, समरजितसिंह घाटगे हे आज काय निर्णय घेणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर घाटगे गटाचा मेळावा कागलमधील बंगला परिसरात होत आहे. महायुतीतून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषित केल्यानंतर नाराज झालेल्या घाटगे यांनी बंडखोरीचे निशाण फडकावले आहेत. आज ते कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत आपला निर्णय जाहीर करणार आहेत.

कार्यकर्त्यांनी समरजित घाटगे (Samarjitsinh Ghatge) यांना 'राम कृष्ण हरी म्हणा आता घ्या हातात तुतारी, असे म्हणत साद घातली आहे. यावेळी शंकर मेते यांनी केलेल्या विधानानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

सभेला संबोधित करताना शंकर मेते म्हणाले, "स्वर्गीय विक्रमसिंह राजेंचा 231 मतांचा पराभव अजून खदखदतोय. हा पराभव झाला नाही. तो केला गेला. याच पालकमंत्र्याने ( हसन मुश्रीफ) केला. तुम्ही दगडाला देव म्हणायला सांगितलं, तर आम्ही ते पण करतो. तुम्हाला आमदार झाल्याचे पाहून माळ बंगल्यात मिठी मारायचं, माझं नवस आहे. हे नवस फिटलं तर आम्ही स्वर्गाची वाट धरायला रिकामे आहोत."

सत्तेतून येणारा पैसा, सत्तेतून येणारी संपत्ती गोळा करायची. बोगस कंपन्या तयार करायचे, हेच सत्ताधिकाऱ्यांचं आजपर्यंतचे धोरण आहे. सरकारने तरूणांच्या रोजगारासाठी काय केले असे म्हणत राहुल कांबळे यांनी सवाल उपस्थित केला.

Kolhapur News
Beed Assembly Election : बीड जिल्ह्यातील विधानसभेच्या हायप्रोफाइल लढती ठरणार लक्षवेधी

गेली दहा वर्षे भाजपसाठी (Bjp ) निष्ठेने काम केले. निस्वार्थी सेवा करत पक्षासाठी वाटेल ते केले. पण, पक्षाच्या नेतृत्वाने आपल्याला डावलले. आता गरज आहे 80 वर्षाच्या योध्याची. राम कृष्ण हरी, वाजवा तुरारी, असे म्हणत प्रकाश सुलगावे यांनी हसन मुश्रीफ यांचा पराभवासाठी सज्ज राहावे, असे आवाहन केले.

या मेळाव्यात भाजप नेते समरजितसिंह घाटगे कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत असून त्यानंतर आपला निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Kolhapur News
Ajit Pawar News : 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांच्या भडकलेलेल्या आंदोलनामागे नेमके कोण? अजित पवारांना भलतीच शंका; म्हणाले,...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com