Sharad Pawa-R.R. Patil Sarkarnama
विशेष

Sharad Pawar News : शरद पवार आज का अस्वस्थ आहेत..? खुद्द पवारांनी सांगितले कारण....

आर.आर. पाटील आज हयात नाहीत. पण, त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांची आजही चर्चा होते.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे कणखर आणि धीरगंभीर नेतृत्व म्हणून ओळखलं जातं. पण कार्यकर्त्यांच्या बाबतीत ते कायम हळवे असतात. असंच नातं त्याचं (स्व.) आर. आर. पाटील (R. R. Patil) यांच्यासोबत होतं. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी ‘आमच्याकडे काही उत्तम सहकारी होते, पण, ते आज हयात नाहीत, त्यामुळे मी आज अस्वस्थ आहे,’ असे सांगून आरआरआबांच्या कामाचे कौतुक केले. (Why is Sharad Pawar restless today... Pawar himself said because...)

राष्ट्रवादीत तुम्ही दमदार अशी नेतृत्वाची दुसरी फळी उभी केली. त्यात खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे. यात बेस्ट ट्रेंड कोणं आहे, असा प्रश्न विचारला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमचे सगळेच सहकारी उत्तम काम करतात. काही लोक उत्तम होतेच. पण ते आज हयात नाहीत, त्यामुळे मी आज अस्वस्थ आहे. उदा. आर.आर.पाटील. आर.आर पाटील हे शून्यातून वर आलेले नेतृत्व होतं. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. पण त्यांना संधी मिळाली, जबाबदारी मिळाली. त्यांनी आपल्या कामाचा, कर्तृत्वाचा महाराष्ट्रात ठसा उमटवला, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, आर.आर. पाटील आज हयात नाहीत. पण, त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांची आजही चर्चा होते. लोक त्यांच्या निर्णयाची आवर्जून आठवण काढतात. तो निर्णय आणखी जोमाने राबवला पाहिजे, अशी मागणी करतात. आमच्या मते राष्ट्रवादी काँग्रेसचं हे भाग्य आहे की, अशा कर्तृत्वान तरुणांचा संच ठिकठिकाणी उभा राहू शकला. काहीजण पक्ष सोडून गेले, काही जण पक्षात राहिले. नवीन आले. नवीनमधून नवे नेतृत्व तयार झाले. हे चक्र राष्ट्रवादीत सतत चालू असतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT