Narendra Modi Sarkarnama
विश्लेषण

PM Modi's Sansad Speech : संसदेच्या कामात आतापर्यंत तब्बल ७५०० लोकप्रतिनिधींनी योगदान दिले; जुन्या संसदेच्या आठवणीत मोदी रममाण

Parliament session : इंद्रजित गुप्ता हे ४३ वर्षे सर्वाधिक काळ या सभागृहाचे सदस्य होते. रहेमान हे वयाच्या ९३ व्या वर्षीही आपले योगदान संसदेच्या कामात देत होते.

Vijaykumar Dudhale

New Delhi : जुन्या संसद भवनातील शेवटच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यात पंतप्रधान पंडित नेहरूंपासून मनमोहनसिंग यांच्यापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांच्या कामाचे कौतुक केले. याशिवाय देशाच्या ७५ वर्षांच्या कार्यकाळात संसदेच्या कामात दोन्ही सभागृहातील तब्बल ७५०० लोकप्रतिनिधींनी योगदान दिले आहे. यात ६०० महिला खासदारांचा समावेश आहे. या सर्वांनी मिळून संसदेचे कामकाज समृद्ध केले आहे, असे गौरवोद्‌गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. (7500 people's representatives have contributed to the work of Parliament so far : Modi)

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या सुरुवातीला नरेंद्र मोदी यांनी जुन्या संसद भवनाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, पहिल्यांदा संसदेत महिलांची संख्या कमी होती. त्यात पुढे वाढ होत गेली. त्यांचेही योगदान देशाच्या कारभारात मोठे आहे. संसदेच्या कामात आतापर्यंत ७५०० लोकप्रतिनिधींनी योगदान दिले आहे. या कालावधीत ६०० महिला संसद झाल्या आहेत. इंद्रजित गुप्ता हे ४३ वर्षे सर्वाधिक काळ या सभागृहाचे सदस्य होते. रहेमान हे वयाच्या ९३ व्या वर्षीही आपले योगदान संसदेच्या कामात देत होते. केवळ २५ वर्षांची चंद्रमणी मुर्मू या सभागृहाची सदस्य झाली होती.

सभागृहात काम करताना अनेकदा वाद-विवाद अझाले. पण आम्ही कौटुंबिक सलोखा जपला आहे. आम्ही कटुता ठेवून जात नाही. सदस्य नसतानाही आम्ही तेवढ्याच प्रेमाने एकमेकांना भेटतो. शारीरिक पिडा असूनही संसद सदस्यत्व निभावले आहे. गंभीर आजार असतानाही आपले कर्तव्य निभावले. काहींना तर डॉक्टरांसोबत यावं लागलं. कोरोना काळातही आमचे दोन्ही सभागृहांचे सदस्य सदनात आले आणि आपले कर्तव्य निभावले. अनेक तपासण्या कराव्या लागायच्या, मास्क घालावा लागायच्या, बैठक व्यवस्था बदलावी लागली. पण संसद चालू ठेवली, असेही मोदींनी नमूद केले.

सेंट्रल हॉल सगळ्यांच्या आवडीचा आहे. अनेकांना मंदिरप्रमाणे संसदेत जाण्याची सवय आहे. अनेक जुने नेते कधी कधी येतात. स्वातंत्र्यानंतर अनेक विद्ववान मंडळींनी शंका उत्पन्न केल्या होत्या. पण, सर्व जगाला चुकीचे ठरवून आपण पुढे आलो. हे सर्व आमच्या जुन्या लोकांसह अनेकांनी केले आहे. त्यांचा गौरव करण्याचा आज क्षण आहे. या संसदेच्या प्रति अनेकांचा विश्वास कायम राहिला आहे. संसद ही जनभावनाची प्रतीक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT