Solapur District BJP Executive : सोलापूर भाजपची १२० जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर; मंगळवेढ्याचा वरचष्मा

Mangalveda Main Role In Executive : मंगळेवढा तालुक्यात पक्षाच्या सरचिटणीसपदासह ओबीसी सेलचे जिल्हा, तसेच ‘भाजयुमो’चे जिल्हाध्यक्षपद आले आहे.
BJP Solapur District Executive
BJP Solapur District ExecutiveSarkarnama
Published on
Updated on

Mangalveda News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे. नव्या रचनेत कोणीही नाराज होऊ नये, याची काळजी जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी घेतली आहे. त्यातून कल्याणशेट्टी यांनी तब्बल १२० जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. या जिल्हा कार्यकारिणीत मंगळवेढ्याचा वरचष्मा राहिला आहे. (Mangalvedha taluka dominates BJP's Solapur district executive)

सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या तयारीने काँग्रेसचे उमेदवार निवडीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच, जनसंवाद यात्रा व इतर उपक्रमांच्या माध्यमातून संघटनात्मक पातळीवर हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे भाजपनेही तयारी सुरू केली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार समाधान आवताडे (पंढरपूर), आमदार विजयकुमार देशमुख (शहर उत्तर), आमदार सुभाष देशमुख (दक्षिण सोलापूर), आमदार सचिन कल्याणशेट्टी (अक्कलकोट) हे चार आमदार भाजपचे आहेत, दोन आमदार विरोधी गटाकडे आहेत. मात्र, मोहोळ तालुक्यात मताधिक्य मिळेल, या दृष्टीने भाजपने नियोजन केले आहे. शिवाय अजित पवार सोबत आल्याने माजी आमदार राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांचा भाजपला फायदा होणार आहे.

BJP Solapur District Executive
Solapur BJP Executive : दोन्ही देशमुखांच्या मुलांना भाजपचे ‘मानाचे पान’; एकाला शहरात, तर दुसऱ्याला 'ग्रामीण'मध्ये संधी

भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी १२० पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यात जिल्हाध्यक्षपदासाठी दावेदार असलेले शशिकांत चव्हाण यांना पूर्वी असलेल्या सरचिटणीस पदावर कायम ठेवले आहे. संतोष मोगले यांना चिटणीसपदावरून, तर गौरीशंकर बुरुकुल यांना मंगळवेढा तालुकाध्यक्षपदावरून जिल्हा उपाध्यक्षपदी स्थान देण्यात आले आहे.

सिद्धेश्वर कोकरे यांना चिटणीस पदावर तर दत्तात्रेय जमदाडे, चंद्रकांत जाधव, मल्लिकार्जुन शिरोळे, राजाराम कालीबाज यांना सदस्य पदावर संधी देण्यात आली. मंगळवेढ्याचे सुदर्शन यादव यांना भाजप जिल्हा युवा मोर्चाच्या सरचिटणीस पदावरून अध्यक्षपदी बढती दिली आहे. विवेक खिलारे यांना जिल्हा ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी पुन्हा कायम ठेवण्यात आले आहे.

BJP Solapur District Executive
Bacchu Kadu On Guwahati: ....नाही तर मी गाडीतून उतरतो; बच्चू कडूंनी दिली होती एकनाथ शिंदेंना धमकी

कार्यकारिणीमध्ये कायम निमंत्रित सदस्य म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, शहाजी पवार, शंकर वाघमारे यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीला जेमतेम काही महिन्यांचा अवधी शिल्लक असताना भाजपनेही अंतर्गत तयारीला वेग घेतला आहे. पदाधिकारी निवडीतून जिल्ह्यात समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.

BJP Solapur District Executive
NCP Leader Congress Metting: काँग्रेसच्या गोपनीय बैठकीला राष्ट्रवादी नेत्याची हजेरी; अकोल्यात खळबळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com