MLA Yashwant Mane, Appasaheb Jagdale, Madhukar Bharne Sarkarnama
विश्लेषण

Indapur Market Committee Election: इंदापुरात आमदार माने, माजी सभापती जगदाळे, फडतरे, भरणेंच्या बंधूंसह मातब्बरांचा शड्डू

खरे चित्र अर्ज माघारी नंतरच स्पष्ट होणार आहे.

संतोष आटोळे

इंदापूर (जि. पुणे) : इंदापूर (Indapur) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत १८ जागांसाठी १५७ अर्ज दाखल झाले आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या गटाने ही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, बाजार समितीसाठी माजी सभापती अप्पासाहेब जगदाळे, आमदार यशवंत माने, आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांचे बंधू व विद्यमान संचालक मधुकर भरणे, माजी सभापती दत्तात्रय फडतरे हे प्रमुख नेतेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. (A record 157 applications filed for 18 seats of Indapur Market Committee)

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी बाजार समितीचे माजी सभापती तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, मोहोळचे आमदार यशवंत माने, आमदार दत्तात्रेय भरणे यांचे बंधू व विद्यमान संचालक मधुकर भरणे, माजी सभापती दत्तात्रेय फडतरे, संग्रामसिंह निंबाळकर, रोहित मोहोळकर, विलास माने, तुषार जाधव, शिवाजी इजगुडे, सचिन देवकर, संदीप पाटील, शिवाजी वाबळे, नानासाहेब शेंडे, सुभाष दिवस, मोहन जाधव, यांच्यासह शेतकरी संघटनेचे नीलेश देवकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख महारुद्र पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत.

दरम्यान, निवडणुकीचे चित्र कसे असेल याविषयी कार्यकर्त्यांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, भाजपने निवडणूक न लढविण्याचा घेतलेला निर्णय वगळता अद्याप कोणत्याही पक्षाने आपली भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे निवडणुकीबाबत फक्त चर्चा होत आहेत. खरे चित्र अर्ज माघारी नंतरच स्पष्ट होणार आहे.

बाजार समितीसाठी ४८२८ जण करणार मतदान

इंदापूर बाजार समितीसाठी एकूण ४ हजार ८२८ मतदार मतदानासाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये सोसायटी मतदारसंघातून ३ हजार ११८, ग्रामपंचायत मतदार संघातून १ हजार १९१, व्यापारी मतदारसंघातून ४६० व हमाल मापाडी मतदारसंघातून ५९ एवढे मतदार पात्र ठरले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT