Indapur Market Committee : हर्षवर्धन पाटील इंदापूर बाजार समितीची निवडणूक न लढविण्याचे हे आहे कारण....

शेतकऱ्यांची संस्था म्हणून ओळख असलेल्या बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे.
Indapur Market Committee : Harshvardhan Patil
Indapur Market Committee : Harshvardhan PatilSarkarnama

इंदापूर (जि. पुणे) : शेतकऱ्यांच्या हितासाठी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी दिली. (We Will not contest Indapur Market Committee elections : Harshvardhan Patil)

इंदापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, बाजार समिती बिनविरोध करण्याची आमची भूमिका असतानाही आमच्याशी कोणीही चर्चा केली नाही, त्यामुळे भाजपच्या वतीने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Indapur Market Committee : Harshvardhan Patil
Market Committee Election : अकलूजमध्ये मदनसिंह, पद्मजादेवी मोहिते पाटील, उत्तम जानकरांसह ८१ जणांचे अर्ज दाखल

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक अध्यक्ष (कै.) शंकरराव पाटील यांनी शेतकरी हिताचा विचार करून ही संस्था चालवली. त्यानंतरच्या काळात २०१९ पासून तालुक्यातील विविध सहकारी संस्था बिनविरोध करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र, ज्यांच्या ताब्यात सत्ता आहे, त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात आमच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. यामुळे शेतकरीहिताचा विचार करता निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही पाटील यांनी नमूद केले.

Indapur Market Committee : Harshvardhan Patil
Market Committee Election : दुधनीत म्हेत्रे गटाच्या दोन जागा बिनविरोध; मात्र कल्याणशेट्टींचे कडवे आव्हान : अक्कलकोटला सिद्रामप्पांविरोधात तानवडे-पाटील-शिंदे

शेतकऱ्यांची संस्था म्हणून ओळख असलेल्या बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे. तसेच, यापूर्वी तालुक्यातील विविध सहकारी संस्था बिनविरोध होण्यासाठी आम्ही पुढाकार घेतल्याचेही पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले.

Indapur Market Committee : Harshvardhan Patil
Rajan Patil News : राजन पाटलांनी पुन्हा ताकद दाखवली : मोहोळ बाजार समिती बिनविरोध; ७५ वर्षांपासून वर्चस्व कायम

या वेळी भारतीय जनता पक्ष तालुकाध्यक्ष शरद जामदार, शहराध्यक्ष शकील सय्यद, लालासाहेब पवार, विलास वाघमोडे, उदयसिंह पाटील, मेघ:शाम पाटील, अशोक इजगुडे, वैभव देवडे, किरण पाटील, तेजस देवकाते आदी यांच्यासह अन्य आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com