Parinay Fuke Controversial Statement On Shivsena sarkarnama
विश्लेषण

Parinay Fuke : मला हे पक्क माहीत झाले की शिवसेनेचाही बाप मीच, म्हणणाऱ्या भाजप आमदाराला शिवसेना देणार आपल्या स्टाईलनं उत्तर

Parinay Fuke Controversial Statement On Shivsena: भाजपचे आमदार परिणय फुके यांनी एका कार्यक्रमात आपल्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे ते अडचणीत सापडले आहेत. शिवसेनेच्या रडारवर सध्या फुके आहेत.

Mangesh Mahale

Summary

  1. परिणय फुके यांचे विधान वादग्रस्त ठरले: भाजप आमदार परिणय फुके यांनी "शिवसेनेचा बाप मीच आहे" असे विधान करून वादाला तोंड फोडले आहे.

  2. शिवसेनेची तीव्र प्रतिक्रिया: शिवसेना नेते संजय कुंभलकर आणि कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला असून माफी न मागितल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

  3. राजकीय आरोप आणि निवडणूक रणनीती: जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला हरवण्यासाठी काँग्रेसला मदत केल्याचा आरोप फुके यांच्यावर आहे.

महायुतीतील आमदार, मंत्री आपल्या वादग्रस्त विधानामुळे सतत चर्चेत आहे. यात आणखी भर पडली आहेत ती म्हणजे भाजपच्या आमदारानं शिवसेनेबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे. नेमके काय झाले आहे. ते जाणून घेऊयात

भाजप आमदारानं केलेल्या विधानाबाबत शिवसेने नेते आक्रमक झाले आहेत. यामुळे महायुतीत वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय जनता पार्टीचे आमदार परिणय फुके यांनी हे विधान केले आहे.

फुके यांच्यावर शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे.तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माफी मागितली नाही, तर आम्ही शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी दिला आहे.

मला पक्कं माहिती झालं, शिवसेनेचा बाप मीच आहे. खापर माझ्यावर फोडले जाते, असे विधान परिणय फुके यांनी भाजप पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केले आहे. फुके यांनी शिवसेनेबद्दल अपमानास्पद भाषा वापरून कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा नेत्याला आवरावे,अन्यथा शिवसेनेचा बाप कोण आहे हे आम्ही सांगू, असा इशारा शिवसेना नेते संजय कुंभलकर यांनी फुके यांना दिला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेनेचे बाप आहेत.अशा परिस्थितीत कोणीही जबरदस्तीने शिवसेनेचे अवैध बाप बनण्याचा प्रयत्न करू नये.नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फुके यांनी शिवसेनेचे उमेदवार डॉ.प्रकाश मालगावे यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस उमेदवाराला सहा मते देण्याचे षड्यंत्र रचले. त्यामुळे मालगावे यांना पराभवाला सामोरे जावे लागले, असे कुंभलकर यांनी पत्रकारांना सांगितले.

काय म्हणाले होते परिणय फुके

माझ्यावर अनेकांनी खापर फोडले. मी काही कोणाच्या आरोपाला उत्तर देत नाहीत. पण त्या दिवशी मला हे माहीत झाले की, कसे असते तुमच्या घरी जर पोराला चांगले मार्क मिळाले, तर कोणाचे कौतुक होते पोरगा किंवा आई. काही चांगले झाले तर कोणी केले आईने केले आणि जर काही खराब झाले तर कोणी केले, बापाने केले. त्या दिवशी मला हे पक्क माहीत झाले की शिवसेनेचाही बाप मीच आहे.

Q1. परिणय फुके यांनी नेमकं काय विधान केलं?
👉 त्यांनी म्हटलं, "शिवसेनेचा बाप मीच आहे."

Q2. शिवसेनेची या विधानावर काय प्रतिक्रिया होती?
👉 शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि माफी न मागितल्यास इशारा दिला.

Q3. भाजप आमदार फुके यांच्यावर कोणता आरोप झाला आहे?
👉 काँग्रेसला सहा मते देऊन शिवसेना उमेदवाराला हरवण्याचा आरोप आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT