Sunil Tatkare Sarkarnama
विश्लेषण

MLC Election : भुजबळ, तटकरे, नितीन पाटलांच्या पाठोपाठ खोडकेंची घराणेशाही; इच्छुकांना संधी न मिळाल्याने राष्ट्रवादीमध्ये नाराजी

NCP Dynasty Politics News : राष्ट्रवादी कॉंग्रेंसने आमदार सुलभा खोडके यांचे पती संजय खोडकेंना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत विधानपरिषदेचा शब्द दिलेल्या इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशाच आली आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या चार महिन्यातच विधानपरिषदेच्या निवडणुका होत आहेत. विधान परिषदेमधील रिक्त पाच जागांसाठी निवडणूक बिनविरोध होत आहे. विधान परिषदेतील पाच पैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला आल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाट्याला एक जागा आली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एकच जागा आल्याने इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे विधानपरिषदेला कॊणाला संधी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेंसने आमदार सुलभा खोडके यांचे पती संजय खोडकेंना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत विधानपरिषदेचा शब्द दिलेल्या इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशाच आली आहे.

विधान परिषदेच्या एका जागेसाठी संजय खोडके यांना संधी दिली असली तरी त्यांच्या उमेदवारीने राष्ट्रवादी काँग्रेसमधील (Ncp) घराणेशाहीवर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अमरावती शहर मतदारसंघातून त्यांच्या पत्नी सुलभा खोडके विजयी झाल्या आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा विधानसभेला शब्द देण्यात आलेल्या इच्छुकांना संधी देण्याऐवजी त्यांचे पती संजय घोडके यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने ऐन निवडणूक काळात नाराजीनाट्य उफाळून येऊ नये म्हणून राष्ट्रवादीकडून दक्षता घेतली जात होती. त्यामुळे हे नाराजीनाटय टाळण्यासाठीच राष्ट्रवादीकडून सोमवारी विधान परिषदेच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास काही तासांचा अवधी शिल्लक असताना करण्यात आली. या प्रकारानंतरही नाराजी लपून राहिली नाही. काही जणांनी विधानपरिषदेची संधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजी मंत्री छगन भुजबळ (chhagan Bhujbal), राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार नितीन पाटील यांच्या कुटुंबात एकापेक्षा जास्त पदे आहेत तर आता संजय खोडके पती-पत्नी विधिमंडळात दिसणार आहेत. त्यामुळे काही ठरविक नेत्याच्या कुटुंबातच उमेदवारी दिली जात असल्याने राष्ट्रवादीमधील निष्ठावंत नेतेमंडळीकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर विधानसभेवर निवडून गेल्याने एक जागा रिक्त आहे. विधान परिषदेच्या या रिक्त जागेसाठी सुरुवातीपासून झिशान सिद्धकी, संजय दौंड, उमेश पाटील, दीपक मानकर, कोते पाटील यांच्यासह 100 पेक्षा अधिक नेतेमंडळी इच्छुक होते.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT