Jalgoan Loksabha Constituency : भाजपने ‘टॉप टेन’ खासदाराला बसविले घरी अन्‌ स्मिता वाघांना उमेदवारी देऊन ‘ती’ चूक सुधारली

Loksabha Election 2024 : या निर्णयामुळे खासदार पाटील यांचे समर्थक नाराज आहेत. मात्र, खासदार पाटील यांनी मला उमेदवारी का मिळाली नाही, याचा मी अभ्यास करणार आहे. झालेल्या चुका दुरुस्त करून नव्या जोमाने कामाला लागणार आहे. पक्षाने आम्हाला आमदार खासदार केले आहे, त्यामुळे पक्षावर कोणतीही नाराजी नाही, असे त्यांनी सांगितले.
Smita Wagh-Unmesh Patil
Smita Wagh-Unmesh PatilSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : जळगावचे भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेष पाटील हे देशातील टॉप टेन खासदारांमध्ये समाविष्ट होते. मात्र, भाजपने उमेदवार जाहीर करताना उत्तर महाराष्ट्रातील सहापैकी पाच खासदारांना उमेदवारी दिली. मात्र, उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारत घरी बसवले.

उत्तर महाराष्ट्रात आठपैकी सहा जागांवर भाजपचे खासदार (BJP MP) आहेत. या सहा खासदारांपैकी पाच खासदारांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र, पहिलीच टर्म असूनही जळगावचे उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांना उमेदवारी नाकारण्यात आली. या ठिकाणी स्मिता वाघ (Smita Wagh) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे जळगावच्या उमेदवारीचा निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Smita Wagh-Unmesh Patil
Madha Loksabha News: अस्वस्थ मोहिते पाटील समर्थकांची 'शिवरत्न'कडे धाव; बैठकीकडे लक्ष

उन्मेष पाटील यांचे नाव ‘टॉप टेन’ खासदारांमध्ये समाविष्ट आहे. त्यांना २०१९ मध्ये पहिल्यांदाच उमेदवारी मिळाली होती. या कालावधीत त्यांनी मतदारसंघात विविध विकासकामे केली. राजकीयदृष्ट्याही त्यांनी विरोधकांवर मात केली होती. चाळीसगाव नगरपालिकेत पहिल्यांदा भाजपची सत्ता आली. बाजार समिती तसेच पंचायत समितीतही भाजपची सत्ता आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. असे असतानाही यंदाच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचा हा निर्णय कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

या निर्णयामुळे खासदार पाटील यांचे समर्थक नाराज आहेत. मात्र, खासदार पाटील यांनी मला उमेदवारी का मिळाली नाही, याचा मी अभ्यास करणार आहे. झालेल्या चुका दुरुस्त करून नव्या जोमाने कामाला लागणार आहे. पक्षाने आम्हाला आमदार, खासदार केले आहे, त्यामुळे पक्षावर कोणतीही नाराजी नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार कोण? यापेक्षा पक्षाचे चिन्ह महत्त्वाचे मानून आम्ही भाजपचे काम करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्रात डॉ. हिना गावित (नंदूरबार), डॉ. सुभाष भामरे (धुळे), डॉ. भारती पवार (दिंडोरी), डॉ. सुजय विखे-पाटील (नगर) आणि रक्षा खडसे (रावेर) या पाच खासदारांना पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली आहे. अशा परिस्थितीत फारसा विरोध नसलेले उन्मेष पाटील यांना मात्र पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने घेतलेला हा निर्णय चर्चेचा विषय आहे. हा निर्णय खासदार पाटील यांच्या समर्थकांना नाराज करणारा ठरला आहे. त्यामुळे त्याची विशेष चर्चा होत आहे.

Smita Wagh-Unmesh Patil
Ranjeetsingh Naik Nimbalkar : दिग्गजांचा पत्ता कट करून दिल्लीचे तिकीट दुसऱ्यांदा मिळविणारे रणजितसिंह निंबाळकर

भाजपने जळगावमधून यंदा स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. माजी आमदार स्मिता वाघ यांना 2019 मध्ये उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र, ऐनवेळी पक्षांतर्गत राजकीय डावपेचात स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यावरून मोठा वादही झाला होता.

स्मिता वाघ यांच्या समर्थकांना त्यावेळी मोठा धक्का बसला होता. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच भाजपच्या नेत्यांवर आरोप-प्रत्यारोपही करण्यात आले होते. त्या अन्यायाचे परिमार्जन म्हणून अनपेक्षितपणे यंदा स्मिता वाघ यांना लोकसभेचे उमेदवारी देण्यात आली आहे, असे बोलले जाते.

Edited by : Vijay Dudhale

R

Smita Wagh-Unmesh Patil
Samadhan Autade News : भाजप आमदार समाधान आवताडेंचे डोळे का पाणावले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com