Rahul Gandhi Congress  Sarkarnama
विश्लेषण

Rahul Gandhi News : राहुल गांधींचे ‘बब्बर शेर’च काँग्रेसची बोट बुडवणार? ऐन रणधुमाळीत, हे वागणं बरं नव्हं!

Rahul Gandhi Faces Internal Rift Within Congress Ahead of Bihar Polls : बिहारमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या विरोधात आपला आवाज बुलंद केला. बिहारमध्ये रॅली काढली. अनेक नेत्यांवर बिहारची जबाबदारी सोपवली आहे.

Rajanand More

Congress Leaders’ Actions Raise Questions During Election Campaign : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्याचे उमेदवारी अर्ज भरण्याची सोमवारी अखेरची मुदत आहे. पण अजूनही इंडिया आघाडीतील जागावाटपाचा घोळ मिटला नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय जनता दलाने सकाळी 143 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे उरलेल्या 100 जागा काँग्रेस व मित्रपक्षांसाठी सोडल्याचे स्पष्ट झाले. पण त्यातही काँग्रेसमधील नेते समाधानी नसून पक्षांतर्गत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

बिहारमध्ये काँग्रेसची ताकद फारशी नाही. त्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी काँग्रेसला 60 ते 70 जागा देऊ करत खरंतर मोठं मन दाखवलं आहे. दुसरीकडे सत्ताधारी एनडीएचे जागावाटप तुलनेने शांततेत झाले. एनडीएतील मित्रपक्षांची नाराजी भाजपने वेळेत दूर करत हा फॉर्म्यूला निश्चित केला. नियोजनबध्द पध्दतीने उमेदवारी अर्जही दाखल झाले. काही ठिकाणी झालेली बंडखोरी शमविण्यात यश आले. पण याउलट स्थिती इंडिया आघाडीतील आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याची आज अखेरची मुदत असताना अजूनही नेमक्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, याचे चित्र स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसशी जवळीक असलेले अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी तर थेट आघाडीचा पुनर्विचार करण्याचा सल्लाच काँग्रेस नेतृत्वाला दिला आहे. आरजेडीकडून आघाडी धर्म पाळला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दुसरीकडे तिकीट वाटपावरून काँग्रेसमध्ये घमासान सुरू आहे. पक्षाने टप्प्याट्प्याने आतापर्यंत चार याद्या जाहीर करत 60 जणांची नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. काही नेत्यांनी तिकीटांची विक्री केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

बिहारमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या विरोधात आपला आवाज बुलंद केला. बिहारमध्ये रॅली काढली. अनेक नेत्यांवर बिहारची जबाबदारी सोपवली. आघाडीच्या बाजूने वातावरण असल्याचे ते जाहीरपणे सांगत होते. पण प्रत्यक्ष तिकीट वाटप सुरू झाल्यानंतर पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. प्रदेश प्रभारी कृष्मा अल्लवरू आणि प्रदेशाध्यक्ष राजेश राम यांच्यावर तिकीट विक्रीचा गंभीर आरोप काही नेत्यांनी केला आहे. आमदार शकील अहमद आणि पप्पू यादव यांच्याकडेही बोट दाखवले जात आहे. या नेत्यांच्या मध्यस्थीमुळे आघाडीमध्ये मिठाचा खडा पडल्याचा आरोप होत आहे.

काँग्रेस आणि आरजेडीमध्ये अखेरपर्यंत समन्वय दिसून आला नाही. राहुल गांधी यांचे बब्बर शेर यामध्ये मागे पडल्याचे चित्र आहे. बिहारमधील जवळपास 60 जागांवर आघाडीचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. काहींचे मतदारसंघ बदलण्यात आले आहेत. त्यामुळेही आघाडीत काही मतदारसंघात प्रचंड नाराजी आहे. विद्यमान आमदार आणि माजी मंत्री मोहम्मद आफाक आलम यांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यांनीच तिकीट विक्रीचा आरोप केला आहे. त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जे पैसे देत आहेत, त्यांना तिकीट मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्यासह एक डझनहून अधिक नेत्यांनी असाच आरोप केला आहे.

एवढेच नाही तर काँग्रेसचे खासदार तारिक अन्वर यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. बरबीघा मतदारसंघात मुन्ना शाही यांचे तिकीट कापण्यावरून त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मागील निवडणुकीत ते अत्यंत कमी फरकाने पराभूत झाले होते. खरं तर त्यांना हरविण्यात आले होते. त्यांना तिकीट न मिळणे हा अन्याय असल्याचे अन्वर यांचे म्हणणे आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडूनही उघडपणे नाराजी व्यक्त केली जात असल्याने पक्षातील अंतर्गत वाद टोकाला गेल्याचे स्पष्टपणे दिसते. ऐन रणधुमाळीत सुरू असलेला हा वाद शमविण्यात पक्षाला यश आले नाही तर मागील निवडणुकीपेक्षा कमी जागा मिळण्याचा धोका आहे. पक्षाला दोन आकडी जागाही मिळणार नाहीत, असे नेतेच सांगू लागले आहेत.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT