Amit Shah Narendra Modi Sarkarnama
विश्लेषण

BJP President News : 43 व्या वर्षीच काँग्रेसच्या सत्तेला सुरूंग अन्..! मोदी-शहांचा ‘किंगमेकर’ आणखी धक्के देणार

Narendra Modi Amit Shah strategist : नितीन नबीन हे बिहार सरकारमध्ये रस्ते विकास मंत्री आहेत. ते पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. अत्यंत कमी वयामध्ये त्यांनी राजकारणात मोठे यश मिळविले आहे.

Rajanand More

BJP young leader : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नबीन यांची नियुक्ती करण्यात आल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामागचे कारणही तसेच आहे. नबीन यांचे वय केवळ ४५ वर्षे आहे. ते बिहार सरकारमध्ये मंत्री आहेत. राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या नावाची कधीच फारशी चर्चा झाली नाही. त्यामुळे नबीन यांच्या नियुक्तीने भाजपमधील नेते, पदाधिकाऱ्यांनाही धक्का बसला असेल. पण ही नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दूरदृष्टीचा भाग असल्याची चर्चा आहे.

पंतप्रधान मोदी आणि शाह हे कोणताही राजकीय निर्णय सहजासहजी घेत नाहीत. मग पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदाबाबत ते रिस्क कसे घेतील? नितीन नबीन यांच्या नियुक्तीमागे अनेक राजकीय समीकरणे दडलेली आहे. नबीन हे इतरांना नवखे वाटत असले तरी त्यांनी पक्षसंघटनेतील झोकून देत काम करण्याची वृत्ती हेरत मोदी-शहांनी त्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकली आहे. पक्षातील सर्वात मोठी जबाबदारी असली तरी नबीन यांनी यापूर्वी अनेक राजकीय मोहिमा फत्ते केल्या आहेत.

नितीन नबीन हे बिहार सरकारमध्ये रस्ते विकास मंत्री आहेत. ते पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. अत्यंत कमी वयामध्ये त्यांनी राजकारणात मोठे यश मिळविले आहे. दोन वर्षांपूर्वी ते छत्तीसगड राज्याचे भाजपचे प्रभारी होते. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते. भूपेश बघेल हे मुख्यमंत्री होते. नितीन नबीन यांच्या रणनीतीपुढे बघेल यांचे सरकार टिकाव धरू शकले नाहीत. विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला आणि काँग्रेसचे सरकार कोसळले.

काँग्रेसचे सरकार उखडून टाकण्यात नबीन यांचा मोठा वाटा होता. पण त्यांना बढती देण्यामागे केवळ एवढेच कारण नाही. मोदी-शहांनी विकसित भारताचा संकल्प साधण्यासाठी पक्षात तरूणाईला संधी देण्याचा एक संदेश यानिमित्ताने दिला आहे. डिजिटल इंडिया, न्यू इंडियाच्या पिढीसाठी कार्यकारी अध्यक्ष युवा असायला हवा, या उद्देशानेही त्यांची नियुक्ती झालेली आहे.

नबीन यांना भाजप पक्षसंघटनेत काम करण्याचाही मोठा अनुभव आहे. प्रामुख्याने भारतीय जनता युवा मोर्चामध्ये त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. ते मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री होते. त्यामुळे संघटनबांधणी आणि समन्वयाच्या बाबतीत त्यांना दांडगा अनुभव आहे. बांकीपूर हा त्यांचा विधानसभेचा मतदारसंघ आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुलाचाही त्यांनी या मतदारसंघात पराभव केला आहे. बांकीपूरसह बिहारमधील निवडणुकीच्या रणनीतीमध्येही त्यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जाते.

नितीन नबीन यांचे कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीमागे संघाची रणनीतीही कामी आल्याची चर्चा आहे. नबीन हे आतापर्यंत कोणत्याही वादात अडकलेले नाही. जमिनीवर राहून काम करणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. कोणताही बडेजाव न करता अत्यंत प्रामाणिकपणे लोकांमध्ये काम करण्यात त्यांचा हातखंडा आहे. मोदी-शहांनी त्यांची नेमकी हीच बाजू हेरली.

भाजपसाठी २०२९ ची निवडणूकही महत्वाची असणार आहे. २०२४ च्या निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे पुढील निवडणूक आव्हानात्मक असेल. त्यादृष्टीनेही नबीन यांच्या नियुक्तीकडे पाहिले जात आहे. पुढील तीन वर्षांत संपूर्ण देश पिंजून काढत युवकांना पक्षासोबत जोडण्याचे आव्हान नबीन यांच्या खांद्यावर असणार आहे. त्यादृष्टीने या युवा नेत्याला मोदी-शहांनी मोठी संधी दिल्याचेही मानले जात आहे. त्यांच्याकडे नव्या वर्षात राष्ट्रीय अध्यक्षपद येऊ शकते. तोपर्यंत कार्यकारी अध्यक्षपद ही औपचारिकता मानली जात आहे. मागील १५ वर्षांत शहा आणि नड्डा यांच्या कार्यकाळात पक्षाने स्वप्नवत कामगिरी केली आहे. त्यामुळे नबीन यांनाही विरोधकांना धक्के देत छत्तीसगडप्रमाणे संपूर्ण देशात ‘किंगमेकर’ व्हावे लागणार आहे.       

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT