Tukaram Mundhe News : अधिवेशनात आरोप होत असताना तुकाराम मुंढेंचा विधानभवनातील व्हिडीओ व्हायरल; तीन शब्दांतच दिला संदेश...

Vidhan Bhavan viral video : विधिमंडळातील आरोपांवर तुकाराम मुंढे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्यावर आरोप फेटाळून लावले आहेत.
IAS Tukaram Mundhe
IAS Tukaram MundheSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Session : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे रविवारी सूप वाजले. नागपुरातील हे अधिवेशन धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावरील आरोपांनी ‘लक्षवेधी’ ठरले. भाजपचे नागपुरातील आमदार कृष्णा खोपडे यांनी सध्या दिव्यांग विभागात प्रधान सचिव असलेल्या मुंढेंविरोधात लक्षवेधी मांडत अनेक गंभीर आरोप केले. त्यांचे समर्थक आपल्याला धमकी देत असल्याचे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर विधानसभेत सांगितले.

नागपुरात असताना मुंढे यांनी मनमानी कारभार केल्याचा आरोप खोपडे यांनी केला आहे. अधिवेशनात फडणवीस यांनी याबाबत चौकशी करण्याचे आश्वासन दिले. सत्ताधारी आमदार मात्र मुंढे यांची बाजू मांडताना दिसते. एकीकडे विधानसभेत आरोप होत असताना मुंढे यांनी तीन दिवसांपूर्वी १२ डिसेंबरला सोशल मीडियात एक व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

नागपुरातील विधानभवनाच्या आवारातील हा व्हिडीओ पोस्ट करताना IAS मुंढे यांनी ‘प्रतिष्ठा, आदर, दूरदृष्टी’ हे तीन शब्द लिहिले होते. यातून त्यांना नेमका काय संदेश द्यायचा आहे, हे स्पष्ट होते. सुटाबुटात विधिमंडळात प्रवेश करतानाचा हा व्हिडीओ आहे. फेसबुकवर या व्हिडीओला ११ हजारांहून अधिक लाईक्स असून जवळपास ७०० कमेंट आहेत. तर १६० जणांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

IAS Tukaram Mundhe
Mahapalika Election : आयोगाने 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी काढले महत्वाचे आदेश; निवडणूक प्रक्रिया, आचारसंहिता, अर्ज भरणे अन् बरंच काही...

पोस्टवरील कमेंटमध्ये अनेकांनी मुंढे यांच्याबाबत अधिवेशनात सुरू असलेल्या वादावर भाष्य केले आहे. अनेकांनी त्यांना पाठिंबा देत त्यांच्या धडाकेबाज कामाचे कौतुक केले आहे. तुम्ही सर्वसामान्यांचे हिरो आहात. सर्वसामान्य जनतेसाठी प्रामाणिकपणे मनापासून काम करती राहा, कारण हेच तुमचे शस्त्र आहे, अशा अनेक भावना मुंढेंच्या पोस्टवर व्यक्त करण्यात आल्या आहेत.

IAS Tukaram Mundhe
BJP working president : देशाच्या राजकारणातील मोठी बातमी; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांच्या नावाची घोषणा, मोदी-शहांचे पुन्हा धक्कातंत्र

दरम्यान, विधिमंडळातील आरोपांवर तुकाराम मुंढे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्यावर आरोप फेटाळून लावले आहेत. कुणाचेही नाव न घेता काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही म्हणून माझ्याविरोधात कटकारस्थान केले जात असल्याची प्रतिक्रिया मुंढे यांनी दिली आहे. चौकशीत निर्दोष आढळल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com