Mumbai News : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन नुकतेच पार पडले. या राष्ट्रीय अधिवेशनानंतर काँग्रेस पक्ष ‘कात टाकणार’ आहे, असे वक्तव्य अनेकदा करण्यात आले, पण यावेळी ते कितपत प्रभावी ठरेल आणि पक्षाच्या संघटनात्मक कार्यपद्धतीत खरेच काही बदल होतील का ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. विशेषतः अशा बदलांमध्ये नेत्यांना स्वतःच्या सवयी, पद, वर्चस्व यामध्ये बदल स्वीकारावा लागणार आहे, जो सहजासहजी पचनी पडतोच असे नाही, त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिवेशन काळातच काँग्रेसमध्ये अनेक संघटनात्मक बदल करण्याचे ठरले होते. त्यासाठी काँग्रेसच्या (Congress) कार्यकारिणीचा विस्तार करण्याचे देखील ठरले होते. त्यानंतर आता काँग्रेसने येत्या काळात संघटनात्मक बदल कारण्याला सुरुवात केली आहे.
त्यानुसार आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता राज्यानुसार एक नवीन काँग्रेस बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी केलेला हा संघटनात्मक बदल काँग्रेस नेत्याच्या पचनी पडणार का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
आगामी काळात लवकरच गुजरातमधील विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. त्यानुसार गुजरातमधील कार्यकारिणीची आतापासूनच नव्याने नियुक्ती केली जाणार आहे. त्याच फायदा गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत होणार आहे.
गुजरातमधील पक्ष संघटनेत कोणताही विलंब न करता राहुल गांधींना (Rahul Gandhi) सुधारणा करायची आहे. ते राजस्थानच्या सीमेला लागून असलेल्या गुजरातमधील अरवली जिल्ह्यातील संघटनात्मक बदलांपासून करत आहेत.
पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री असतानाही काँग्रेस नेहमीच विरोधी पक्षात राहिली. 2022 च्या निवडणुकीत पक्षाच्या जागा 17 पर्यंत कमी झाल्या तेव्हा हे पहिल्यांदाच घडले. यानंतर काँग्रेसचे चार आमदार भाजपामध्ये सामील झाले. यानंतर पक्षाच्या आमदारांची संख्या आता 12 पर्यंत कमी झाली आहे.
दुसरीकडे गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने केलेलया एंट्रीमुळे काँग्रेस कमकुवत झाली आहे. त्यामुळे आता काँग्रेसने गुजरातच्या अरवली जिल्ह्यापासून बदलांना सुरुवात केली आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये होणारे पक्षांतर थांबवता आले नाही.
त्यामुळे 2027 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी, राहुल गांधी गुजरातमध्ये काँग्रेसला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जेणेकरून पुरेशी आणि आवश्यक तयारी करून भाजपला आव्हान देणे शक्य होणार आहे. त्यासाठी आता काँग्रेसकडून गुजरातमधील जिल्हा संघटनांना बळकटी देण्यासाठी एक ब्ल्यूप्रिंट तयार करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘नवा गुजरात-नवा काँग्रेस’ चा नारा दिला होता. गुजरातमध्ये काँग्रेसमध्ये आता नवीन प्रश्न घेऊन जनतेमध्ये जाणार आहे, त्याची तयारी आतापासूनच युद्धपातळीवर करण्यात आली आहे. त्यामुळे आता येत्या काळात काँग्रेस नेत्याकडून करण्यात येणाऱ्या या बदलला कसा प्रतिसाद मिळणार? यावर यश अपयश अवलंबुन असणार आहे.
काँग्रेसने जरी संघटनात्मक बदलांचे संकेत दिले असले तरी, पण हे “पचनी पडणे” हीच खरी परीक्षा आहे. काँग्रेस जर खरोखरच नव्या युगासाठी सज्ज होत असेल, तर केवळ चेहऱ्यांची नव्हे, तर कार्यपद्धती, संवादशैली, निर्णयप्रक्रिया यामध्येही परिवर्तन आवश्यक आहे. नेत्यांनी ‘त्याग’ आणि ‘परिवर्तन’ हे केवळ घोषवाक्य न ठेवता त्याची अंमलबजावणी केली, तरच हे बदल येत्या काळात खऱ्या अर्थाने पचनी पडतील.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.