Sangli News : काँग्रेस असो किंवा महाविकास आघाडी सांगलीत दोन मोठे धक्के बसले आहेत. नुकतेच काँग्रेसच्या बंडखोर नेत्या तथा जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी महायुतीचा रस्ता धरला. चंद्रहार यांच्यामुळे ठाकरेंच्या पक्षाला फरक पडलेला नाही. पण जयश्री पाटील यांच्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसलेला आहे. (Jayashree Patil joins Mahayuti after defection from Congress, Vishwajeet Kadam and Vishal Patil plan local election recovery in Sangli)
आता या धक्क्यातून काँग्रेसला बाहेर काढण्यासाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील पुढे आले आहेत. दोघांमध्ये सध्या गुफ्तगू सुरू असून ते काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बोलताना दिसत आहेत. भारती मेडिकल कॉलेजमध्ये दोघांनी बराच वेळ चर्चा केली.
या चर्चेमध्ये जुन्यांना रोखायचे आणि नव्या चेहऱ्यांचा शोध घ्यायचा, असे धोरण या दोघांच्या चर्चेत ठरल्याचे बोलले जात आहे. सध्या शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील विधानसभेतील घडामोडींमुळे नाराज आहेत. काँग्रेसच्या पदावर असले, तरी तूर्त ते संघटनात्मक बांधणी आणि पक्षीय कार्यक्रमांपासून अंतर राखून आहेत. त्यांची नाराजी कदम-पाटील जोडीला दूर करावी लागणार आहे.
याआधी महापालिका निवडणुकीत मदनभाऊ गटाचा काँग्रेसमध्ये वरचष्मा असायचा, विशाल यांना त्यांच्या काही जागा घेऊन समाधान मानावे लागायचे. या निवडणुकीत ते आता काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत आणि त्यांच्या धोरणाप्रमाणेच जागा वाटप होणार आहे. अर्थात, विश्वजित कदम यांची संमती, अनुकुलता महत्त्वाची असेल. त्यात पृथ्वीराज पाटील यांनी मागचे सारे विसरून समवेत राहावे, असा प्रयत्न एका बाजूने सुरू झाला आहे.
दुसऱ्या बाजूला श्रीमती पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे नाराज असलेले काही शिलेदार हाताला लागावेत, यासाठीही विशाल पाटील व्यूहरचना करत आहेत. त्यात पुढाकार विशाल यांचा असला, तरी ‘शब्द’ विश्वजित यांचाच चालणार आहे. त्यामुळे सध्यातरी विशाल-विश्वजीत यांच्यात मिले सुर मेरा तुम्हारा तो... असाच अंदाज दिसत आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आक्रमक खेळी करत असून काँग्रेससह इतर पक्षातील चेहरे हेरून ते फोडत आहे. यामुळे काँग्रेससमध्ये एकटे लढण्याची ताकद उरलेली नाही. त्यामुळे काँग्रेसला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मदत घ्यावी लागेल. यासाठी पहिल्या टप्प्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.