BJP, AAP, Congress and Delhi Vidhansabha Election : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं आहे. भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस या तीन राजकीय पक्षांनी मतदारांना स्वत:कडे खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणजे या तिन्ही पक्षांकडून दिल्लीतील मतदारांवर मोफत योजनांचा अक्षरशा पाऊस पाडला जात आहे.
कोणता पक्ष मतदारांना जास्तीत जास्त मोफत देऊ शकतो, याची जणून चढाओढच सुरू आहे. त्यानुसार त्या पक्षाच्या नेते मंडळींकडून जाहीरपणे आश्वासनही दिली जात आहेत. एकूणच विकासाचे मुद्दे आणि नागरिकांच्या मूळ समस्यापेक्षा राजकीय पक्षांकडून मोफत योजनावर भर दिला जात असल्याचे दिसत आहे. आम आदमी पार्टीने(AAP) जेव्हा 2015मध्ये पहिल्यांदा स्वबळावर निवडणू लढवून सरकार बनवलं होतं. तेव्हा हे म्हटलं गेलं होतं की, पक्षाला 70 पैकी 67 जागांवर विजय मोफत वीज-पाणी या मुद्य्यांवर मिळाला. तर 2020मध्येही मोफत वीज-पाणी या आश्वासनांनी कमाल केली आणि पक्षाला दिल्लीत 62 जागांवर विजय मिळाला होता.
यंदाच्या निवडणुकीत भाजप(BJP) आणि काँग्रेसकडून या मोफत देण्याच्या शर्यतीत आम आदमी पार्टील मागे टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. कारण, या दोन्ही राजकीय पक्षांकडून दिल्लीत मतदारांसाठी अनेक मोठ मोठ्या घोषणा केल्या जात आहेत. तर आम आदमी पार्टीही सत्तेची हॅट्रिक साधण्यासाठी पूर्णपणे जोर लावत आहे.
१) महिलांना २१०० रुपये महिना आणि मोफत बस प्रवास
२) भाडेकरूनाही वीज-पाणी मोफत मिळणार अन् चुकीचे वीज बील माफ होणार.
३) वयोवृद्धांना पेन्शन अडीच हजार रुपये महिना दिले जाणार
४) शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास अन् मेट्रो तिकीटात 50 टक्के सवलत.
५) संजीवनी योजनेअंतर्गत ज्येष्ठान सरकारी आणि खासगी रुग्णालयात मोफत उपचार
१) महिलांना दर महिन्यासा अडीच हजार रुपये, तर गर्भवती महिलांना 21हजार रुपये देणार
२) मोफत वीज आणि पाणी योजना सुरूच राहील.
३) ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना अडीच हजार, तर ७० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना तीन हजार रुपये महिना.
४) KG ते PG मोफत शिक्षण देणार, स्पर्धात्मक परीक्षांसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ हजार अन् दलित विद्यार्थ्याना कोर्ससाठी दहा हजार रुपये देणार
५) ५०० रुपयांमध्ये एलपीजी सिलिंडर अन् होळी व दिवाळीला मोफत दिले जाणार
६) आयुष्मान योजना लागू करून पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार
१) महिलांना दर महिन्याला अडीच हजार रुपये देणार
२) ३०० युनिट पर्यंत मोफत वीज
३) सुशिक्षित बेरोजगार युवकांना दर महिन्याला साडेआठ हजार रुपये भत्ता देणार
४) ५०० रुपयांमध्ये एलपीजी सिलिंडर अन् रेशन कीट मोफत
५) २५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा
याशिवाय आम आदमी पार्टीकडून ऑटो-टॅक्सी आणि ई रिक्षा चालकांच्या मुलींच्या विवाहासाठी १ लाख रुपये देणार आणि १० लाख रुपयांच्या आरोग्य विमासारखी मोठी आश्वासनही दिली गेली आहेत. तर भाजपने गिग वर्कर्ससाठी दहा लाख रुपयांचा आरोग्य विमा आणि ५ लाख रुपयांचा अपघात विमा देणार असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे काँग्रेसने जीवन रक्षा योजने अंतर्गत दिल्लीच्या सर्व लोकांसाठी २५ लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्याचे आश्वासन दिले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.