
BJP - Congress News : 2024मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपला मिळणाऱ्या देणगीच्या रक्कमेत मागील वर्षीच्या तुलनेत 87 टक्के वाढ झाली असून, 3 हजार 967.14 कोटी रुपयांवर पोहचली आहे. तर पक्षाच्या एकूण शेअरमध्ये निवडणूक रोख्यांची भागीदारी घटून अर्धापेक्षाही कमी राहिली आहे. जसे की भाजपच्या 2023-2024च्या वार्षिक ऑडिट रिपोर्टमध्ये सांगितले गेले होते.
सोमवारी निवडणूक आयोगाकडून प्रकाशित वार्षिक रिपोर्टमधून समजले की, भाजपला दिली गेलेली स्वैच्छिक देणगी 2022-23 मध्ये 2,120.06 कोटी रुपयांवरून वाढून 2023-24 मध्ये 3,967.14 कोटी रुपये झाली.
रिपोर्टनुसार भाजपला(BJP) निवडणूक रोख्याच्या स्वरूपात 1685.62 कोटी रुपये मिळाले आहेत, जे त्यांच्या एकूण देणगीच्या 43 टक्के आहे. तेच 2022-23मध्ये पक्षाला निवडणूक रोख्यांच्या रूपात 1294.14 कोटी रुपये मिळाले होते. जे एकूण योगदानाच्या 61 टक्के होते. मागील वर्षी फेब्रुवारीत सर्वोच्च न्यायालयात निवडणूक रोख्यांच्या योजनेस असंविधानिक ठरवले होते आणि ते रद्दही केले होते.
रिपोर्टनुसार, लोकसभा निवडणूक(Loksabha Election) वर्षासाठी भाजपचा सर्वसाधारण प्रचारावरील खर्च गेल्या वर्षीच्या 1092.15 कोटी रुपयांवरून वाढून, 1754.06 कोटी रुपये झाला. यामध्ये 591.39 कोटी रुपये जाहिराती आणि प्रचारावर खर्च केले गेले. काँग्रेस भलेही देणगीच्या बाबत भाजपपेक्षा बरीच मागे राहिली, मात्र निवडणूक वर्षात त्यांच्याही देणगीत चांगली वाढ दिसून आली.
काँग्रेसच्या(Congress) रिपोर्टमधून समजले आहे की, पक्षाच्या देणगीत 2022-2023 मध्ये 268.62 कोटी रुपयांमध्ये तब्बल 320 टक्के वाढ झाली आहे आणि ही रक्कम 2023-2024 मध्ये 1,129.66 कोटी रुपये झाली. पक्षाला मिळालेल्या एकूण देणगीत निवडणूक रोख्यांची हिस्सा 73 टक्के राहिला, जो 828.36 कोटी आहे. तर, 2022-2023 मध्ये 171.02 कोटी रुपये होता. काँग्रेसचा निवडणूक खर्च 192.55 कोटी रुपयांवरून वाढून 619.67 कोटी रुपये झाला.
मागील आठवड्यात निवडणूक आयोगाकडून प्रकाशित 2023-24साठी टीएमसीच्या वार्षिक ऑडिट रिपोर्टनुसार पक्षाचे उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत 333.46 कोटी रुपयांवरून वाढून 646.39 कोटी रुपये झाले. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पक्षाला 95 टक्के निधी मिळाला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.