Devendra Fadnavis-Sanjay Raut
Devendra Fadnavis-Sanjay Raut  sarkarnama
विश्लेषण

संजय राऊतांनी तासभर आरोप केले; पण फडणवीसांनी एकाच वाक्यात उत्तर दिले...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तब्बल एक तास पत्रकार परिषद घेऊन आरोपांच्या फैरी झाडत भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. त्याला भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अवघ्या एका वाक्यात उत्तर दिले आहे. ‘योग्य वेळी योग्य ते उत्तर देण्यात येईल’ या एका वाक्यात उत्तर देत फडणवीसांनी राऊत यांच्या आरोपांकडे एकप्रकारे दुर्लक्ष केले. (Devendra Fadnavis responds to Sanjay Raut's hour-long allegation in one sentence)

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गेल्या काही दिवसांपासून राऊत यांच्यावर निशाणा साधण्यात येत होता. त्याला उत्तर देण्यासाठी खासदार राऊत यांनी आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी राऊत यांनी अनेक गौप्यस्फोट करत भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी आम्हाला मदत करा; अन्यथा तुम्हाला टाईट करण्यात येईल, अशी धमकी भाजप नेत्यांनी दिल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. त्यामुळे राज्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली आहे.

खासदार संजय राऊत यांनी केलेले आरोप

१) महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजप नेत्यांकडून धमकी

२) सरकार पाडण्यासाठी मदत न केल्यास टाईट करण्याची धमकी

३) देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, त्यांच्या काळात महाआयटीमध्ये सुमारे ५ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार

४)फडणविसांच्या काळातील पाच हजार कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब माझ्याकडे. आधी EOW कडे तक्रार करणार आणि नंतर हे प्रकरण ईडीकडे जाणार

५) राकेश वाधवान यांच्यापासून 12 हजार कोटी रुपयाची जमीन मोहित कंबोजने 100 कोटी रुपयांत खरेदी केली

६) मोहित कंबोज हा फडणवीसांचा फ्रंट मॅन, तो फडणविसांना बुडविणारा आहे

७) ईडीच्या लोकांनी 80 वर्षांच्या वृद्धाला पकडून नेले. तो रडत होता.

८) महाराष्ट्र, बंगाल आणि झारखंड येथील सरकारे पाडण्याचे कारस्थान

९) मुंबईतील प्रतिष्ठित बिल्डरांकडून ईडीच्या नावाखाली वसुली सुरू आहे. मुंबईतील साठ बिल्डरांकडून तीनशे कोटींची वसुली.

१०)जितेंद्र चंद्रालाल नवलाणी हा कोण आहे? हे नाव ऐकून दिल्लीतील ईडीच्या लोकांना श्वास रोखेल.

११ PMC बॅंक घोटाळ्याचा तपास ईडी करत आहे. सोमय्या यांच्या भ्रष्टाचाराचे कागद मी ईडीला पाठवले आहेत.

१२) राजेंद्र लखाणी हा सोमय्या यांचा फ्रॅंटमॅन

१३) निकाॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कोणाची आहे? ही सोमय्यांची कंपनी आहे. PMC घोटाळ्यातील आरोपी वाधवान याला ब्लॅकमेल करून सोमय्यांनी 80 ते 100 कोटी रुपयांची रोकड घेतली.

१४)निकाॅन कन्स्ट्रक्शनमार्फत दोन ठिकाणी जमीन घेतली. या कंपनीचे सर्व प्रकल्प रद्द करा, असे माझे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना आवाहन आहे.

१५)किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना तातडीने अटक करा.

१६) PMC बॅंक घोटाळ्यातील पैसे मी वापरत असल्याचा सोमय्या सांगतात. पण त्यातील राकेश वाधवानने वीस कोटी रुपये भाजपच्या अकौंटमध्ये गेले आहेत.

१७) एक दूधवाला पाच वर्षांत सात हजार कोटींचा मालक कसा झाला?

१८) माजी वनमंत्री सुधीर मुनगंटिवार यांच्या मुलीच्या लग्नाबद्दल आम्ही काही बोललो का? त्यांच्या मुलीच्या लग्नातील सेट साडेनऊ कोटी रुपयांचा होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT