Modi declines Trump invite : पहलगाम दहशतवादी हल्ला अन् भारत-पाकिस्तानातील संघर्षानंतर बुधवारी अमेरिकेत सर्वात मोठी घडामोड घडत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्यासाठी जेवणाचा बेत आखला आहे. थेट व्हाईट हाऊसमध्ये आज रात्री मुनीर ट्रम्प यांच्यासोबत जेवणाच्या ताटावर दिसतील. दहशतवादाविरोधात भारतासोबत असल्याचा दिखावा करणाऱ्या ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच आणखी एक महत्वाची घडामोड आजच घडली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील नऊ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देत पाकला धडा शिकवला. बिथरलेल्या पाकने नंतर शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवत माघार घेतली. पण दोन्ही देशांममध्ये आपण समझोता घडवून आणल्याचा दावा ट्रम्प यांनी केल्याने राजकीय वादळ उठले. त्यावर ट्रम्प हे सातत्याने ठाम राहिले. अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचे सर्व दावे त्यांच्याच तोंडावर खोडून काढले.
कॅनडाच्या दौऱ्यावर असताना मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून संवाद झाला. या संभाषणात मोदींनी ट्रम्प यांना त्यांच्या भूमिकेवरून सुनावले. भारत आणि पाकिस्तानमध्ये इतर कोणाचाही मध्यस्थी आपल्याल मान्य नाही आणि यापुढे मान्य नसेल, असे मोदींनी स्पष्ट केले. दहशतवाद म्हणजे आपल्यासाठी युध्दच असल्याचेही मोदींनी ठणकावून सांगितले.
दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर ट्रम्प यांनी मोदींना थेट कॅनडातून अमेरिकेत येण्याचे निमंत्रण दिले. मोदींच्या दौऱ्यात अमेरिकेला जाणे नव्हते. ते थेट क्रोएशियाला गेले. पण मोदींना अमेरिकेला येण्याचे निमंत्रण देण्यामागे ट्रम्प यांचा काही ट्रॅप होता का, यावरून आता चर्चांना उधाण आले आहे. यामागे कारणही असेच आहे. पाक लष्कर प्रमुख मुनीर आजच अमेरिकेत आहेत.
भारत आणि पाकिस्तानला एकाच दिवशी अमेरिकेत आणून किंवा एकाच व्यासपीठावरून आणून ट्रम्प स्वत:ला महान सिध्द करण्याच्या बेतात होते का, आपण जागतिक नेते आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न ते करणार होते का, भारत आणि पाकमधील संघर्ष आपणच संपविला, हे सांगण्यासाठी तर त्यांची ही डिप्लोमेटिक खेळी तर नव्हती ना, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांचा आग्रह धुडकावून लावत थेट क्रोएशियाला जाणे पसंत केले. दहशतवादाच्या मुद्यावर भारताने कठोर भूमिका घेतली आहे. अशावेळी पाकच्या लष्करप्रमुखांना ट्रम्प जेवायला बोलत असतील, तर भारत कधीच मान्य करणार नाही. भारत आणि पाक कधीच एका व्यासपीठावर येणार नाहीत, हे भारताने ट्रम्प यांना दाखवून दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.