Modi-Trump Call : पाक लष्कर प्रमुखांच्या भेटीआधीच ट्रम्प यांना मोदींनी 35 मिनिटं सुनावलं; हे 5 मुद्दे आहेत महत्वाचे...

Narendra Modi’s Strategic 35-Minute Call to Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये बुधवारी सुमारे 35 मिनिटे फोनवरून बोलणे झाले. या संभाषणामध्ये मोदींनी ऑपरेशन सिंदूर, अमेरिकेची मध्यस्था, पाकमधील दहशतवाद अशा महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
Narendra Modi And Donald Trump
Narendra Modi And Donald TrumpSarkarnama
Published on
Updated on

PM Modi discusses Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष आपल्या मध्यस्थीमुळे थांबल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. भारताने हा दावा फेटाळून लावला होता. मात्र, ट्रम्प यांच्या दाव्यावरून विरोधकांकडून सातत्याने सरकारवर टीकास्त्र सोडले जात होते. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी थेट ट्रम्प यांनाच सुनावले.

पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये बुधवारी सुमारे 35 मिनिटे फोनवरून बोलणे झाले. या संभाषणामध्ये मोदींनी ऑपरेशन सिंदूर, अमेरिकेची मध्यस्था, पाकमधील दहशतवाद अशा महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे ट्रम्प हे पाकचे लष्कर प्रमुख मुनीर यांना भेटण्याआधीच मोदींनी त्यांना फोन केला होता. संभाषणाबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी माहिती दिली.

काय झाले बोलणे?

पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या ऑपरेशन सिंदूरबाबत सविस्तर चर्चा झाली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवादविरोधातील आपला दृढनिश्चय संपूर्ण जगाला दाखवून दिला आहे. भारताने याबाबत जगातील अनेक देशांमध्ये पाठविलेल्या सात शिष्टमंडळांचा संदर्भ मोदींनी यावेळी दिला.

Narendra Modi And Donald Trump
DK Shivakumar Video : काँग्रेसचे संकटमोचक शिवकुमार यांचा ‘फ्लॉप शो’; विधानसभेच्या दारातच गेला 'तोल' अन्...

दहशतवादाविरोधात भारताकडून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले जाईल. गोळीच्या बदल्यात गोळी, असे सडेतोड शब्दांमध्ये मोदींनी ट्रम्प यांच्यासमोर आपली भूमिका स्पष्ट केली. दहशतवाद हा युध्दासारखाच आहे. ऑपरेशन सिंदूर थांबलेले नाही, असे सांगत मोदींनी थेट पाकिस्तानला इशारा दिला.

मध्यस्थेच्या मुद्यावर मोदींनी ट्रम्प यांना सुनावले. भारत आणि पाकिस्तानदरम्यान भारताने कधीही कुणाची मध्यस्थता मान्य केलेली नाही आणि यापुढेही स्वीकारणार नाही. भारत राजकीय बाबतीत या मुद्यावर ठाम आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी 35 मिनिटांच्या संभाषणामध्ये ट्रम्प यांना सांगितले.

Narendra Modi And Donald Trump
Gujarat riots 2002 Modi : गुजरात हत्याकांडावेळी मोदींनी राजीनामा दिला का? सीएम सिद्धरामय्या यांचं भाजपला जोरदार प्रत्युत्तर

भारत आणि पाकमध्ये सुरू असलेले हल्ले-प्रतिहल्ले थांबविण्याबाबत चर्चा केवळ भारत आणि पाकिस्तानमध्येच झाली आहे. भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानच्या विनंतीनंतर दोन्ही लष्करामध्ये थेट योग्य मार्गाने ही चर्चा झाल्याचेही मोदींनी ट्रम्प यांना सांगितले. या संपूर्ण घटनाक्रमामध्ये कधीही, कोणत्याही स्तरावर भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार किंवा मध्यस्थतेबाबत चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संभाषणादरम्यान ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना कॅनडातून परतताना अमेरिकेत येण्याचा आग्रह केला. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे पंतप्रधान मोदींनी असमर्थता दाखविली. पुढील काही दिवसांत भेटण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती परराष्ट्र सचिवांनी दिली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतात येण्याचे निमंत्रण स्वीकारल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान मोदी जी-7 बैठकीसाठी कॅनडामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी ट्रम्प यांच्याशी फोनवरून संवाद साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com