मुंबई महानगरपालिका निवडणूक 2025 ही महाराष्ट्राच्या राजकारणासाठी लिटमस टेस्ट ठरणार आहे. विशेषत:दोन्ही शिवसेनेसाठी ही निवडणूक महत्वाची ठरणार आहे. शिवसेनेच्या फूटीनंतर पहिल्यांदात दोन्ही पक्षातील शिवसैनिक निवडणुकीत भिडणार आहेत. दोन्ही शिवसेनेचे राजकीय भवितव्य ही निवडणूक अधोरेखीत करणार आहे.
शिवसेनेच्या फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण लागले. अनपेक्षीत युती-आघाडी झाली. मुंबई महापालिका हा आमचा बालेकिल्ला असल्याचे सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दंड थोपटले आहे.
विधानसभेत शिंदे सेनेत यश मिळवत ठाकरे सेनेचा हा दावा खोडून काढला आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदे सेनेचा काही प्रमाणात सेटबॅक बसला असला तरी मुंबई महापालिकेत ‘ठाणे पॅटर्न’ राबवल्यास शिंदे सेना कमबँक करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. सध्या राज्याच्या राजकारणात 'ठाणे पॅटर्न'हा शब्द कानी पडत आहे.ठाणे पॅटर्न ही एकनाथ शिंदेंची खास रणनीती आहे. ठाणे महानगरपालिकेत एकनाथ शिंदे हा विशिष्ट पॅटर्न राबवून शिवसेना (शिंदे गट)च्या ताब्यात महापालिका ठेवली आहे. हाच ठाणे पॅटर्न शिंदे हे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राबवणार आहेत.
स्थानिक समस्या सोडवण्यावर ठाणे पॅटर्नमध्ये भर देण्यात आला आहे. विविध समाजघटकांशी जोडून त्यांच्या समस्या सोडवणे हा मुख्य मुद्दा ठाणे पॅटर्नचा आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेच्या बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. अतिशय सूक्ष्म नियोजन ठाणे पॅटर्नचे असते. त्यामुळे थेट नागरिकांशी संपर्क साधून स्थानिक समस्या सोडवण्यात येत आहेत. ठाण्यातील शिंदेंची ही रणनिती आता मुंबईत राबवली जाणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी पक्ष नेत्यांसोबत बैठका घेऊन त्यांना जबाबदाऱ्या वाटल्या आहेत. हे नेते आतापासूनच कामाला लागले आहेत. ठाण्यातील विविध विकास कामे उदाहरणार्थ पाणी पुरवठा योजना, कचऱ्याचे वर्गीकरण, त्याची विल्हेवाट आदी योजना यशस्वी ठरल्या आहेत. हाच ठाणे पॅटर्नमुळे स्थानिक पातळीवर शिंदेचे संघटन मजूबत आहे.
ठाणे महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांनी विविध जाती, समाज, व्यवसायांनुसार सेल तयार केले असून प्रत्येक सेलमध्ये त्या गटातील प्रतिनिधी नेमून त्यांच्या समस्या सोडवल्या आहेत.
मजूर संघटना, व्यापारी संघटना, वारकरी मंडळ यांचे सेल स्थापन करुन त्यांच्याशी नेहमीच संपर्कात असतात. ठाणे पॅटर्नमुळे ठाण्यावर शिंदेसेनेची पकड मजबूत झाली आहे.
मुंबईत सध्या २५ ते ३० सेल तयार करण्यात आले आहे. यात सेलचा फायदा शिंदे सेनेला आगामी निवडणूक होईल,हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.