ब्रिजमोहन पाटील -
Nationalist Congress Party Lose National Party Status : केंद्रीय़ निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे. यामुळे आता राष्ट्रवादी हा प्रादेशिक पक्ष राहिला आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय म्हणजे राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, या निर्णयामुळे राष्ट्रवादीला तोटा होण्याऐवजी अधिक फायदाच होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधकांची भाजप विरोधात मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. याचवेळी निवडणूक आयोगाच्या निकषांचे पालन होत नसल्याने राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा काढून घेण्यात आला आहे.
राष्ट्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा दर्जा काढून घेतला तरी पक्षाचे नेते शरद पवार यांच्या प्रतिमेला धक्का बसणार नाही. उलट देशभरातील इतर प्रादेशिक पक्ष पवार यांचे नेतृत्व जास्त खळखळ न करता मान्य करतील असं स्पष्ट केलं आहे.
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रकाश पवार म्हणाले, देशाच्या राजकारणात शरद पवार यांच्या एवढे अनुभवी नेते नाहीत. त्यामुळे त्यांचे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतल्याने त्याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसवर होईल. पण पवार यांचे महत्त्व कमी होणार नाही. राष्ट्रीय पातळीवर पवार यांचे महत्त्व हे पक्षाच्या मताच्या टक्केवारी नाही तर त्यांच्या अनुभवामुळे असल्याचंही पवार म्हणाले.
प्रकाश पवार पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतल्याने देशातील इतर प्रादेशिक पक्ष जास्त खळखळ न करता पवार यांचे नेतृत्व मान्य करून त्यांच्या सोबत येऊ शकतात. या निर्णयाचा हा उलट पवार यांना फायदाच होण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्राचा स्वाभीमान प्रज्वलित करणारा प्रादेशिक पक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्ते अधिक तीव्र भावनेने काम करतील असे या निर्णयामुळे दिसून येण्याची शक्यता पवार यांनी व्यक्त केली.
निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक...
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भाष्य केलं. जगताप म्हणाले, शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर भाजपच्या विरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे काम करत आहेत. त्यामुळे भाजपने निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने ना निर्णय घेतला आहे. पण आम्ही यामुळे खचून जाणार नाही, उलट आगामी निवडणुकीत आम्ही ताकद दाखवून देणार असल्याचं जगताप यावेळी म्हणाले.
...हा आमचा आत्मविश्वास वाढविणारा निर्णय...
आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यावर आपचे राज्य संघटक विजय कुंभार म्हणाले, हे यश मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम करणारे देशातली सर्व नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे अभिनंदन. हा निर्णय आमचा आत्मविश्वास वाढविणारा असल्याने कार्यकर्तेही उत्साहाने काम करतील. तसेच आगामी महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला होईल असंही कुंभार यांनी यावेळी सांगितले. (Latest Maharashtra News)
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.