Sanjay Gandhi Role in Emergency Sarkarnama
विश्लेषण

50 Years Of Emergency: संजय गांधींची आणीबाणीमध्ये काय भूमिका होती? मुख्यमंत्री अन् प्रशासकीय अधिकाऱ्यांना देत होते आदेश

Sanjay Gandhi Role in Emergency: इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी संजय गांधी यांच्या खोलीत टेलिफोनची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. या माध्यमातून संजय गांधी हे काँग्रसचे शासित राज्याचे मुख्यमंत्री, पोलिस आयुक्त, दिल्लीचे उपराज्यपाल, पक्षाचे पदाधिकारी यांच्या संपर्कात राहायचे.

Mangesh Mahale

पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शिफारशीनुसार २५ जून १९७५ रोजी तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अहमद यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती. या घटनेला आज ५० वर्षे झाली आहेत. इंदिरा गांधी यांच्या शिफारशीने देशात आणीबाणी लागू करण्यात आलेली असली तरी त्यांचे पुत्र संजय गांधी यांनीदेखील त्या काळात मोठी भूमिका बजावली होती.

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण संजय गांधी यांच्याबाबच चपलख बसते. 1969 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुपुत्र संजय गांधी यांनी 23 व्या वर्षी लहान, कमी किंमतीत तयार होणारी कार बनविण्याासाठी परवाना मागितला होता. या परवानासाठी अनेक जण रांगेत होते. पण 1970 मध्ये हा परवाना संजय गांधी यांना मिळाला. यावरुन विरोधकांनी इंदिरा गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली होती, घराणेशाहीचा आरोप लागला होता. पण इंदिराजींनी याकडे फारसे लक्ष दिले नाही.

मारुती कार कारखान्यासाठी संजय गांधी यांनी 300 एकर जमीन खरेदी केली होती. हा मुद्यांवरुन तेव्हा राजकारण रंगले होते. बन्सीलाल यांच्या नेतृत्वाखाली हरियाणा सरकारने त्यांना 300 एकर जमीन कवडीमोल भावाने दिली होती. याचे भूसंपादन करताना हजारो शेतकऱ्यांवर अन्याय झाला होता. इंदिराजींचे मुख्य सचिव पी.एन. हक्सर यांनीही मारुती कार योजनेसाठी होत असलेल्या भूसंपादनाला विरोध केला होता. पी.एन. हक्सर हे 1973 पर्यंत इंदिराजींचे मुख्य सचिव होते. त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

सत्तेत खुटा रोवण्याचा हा संजय गांधी यांचे हे सुरवातीचा प्रयत्न होता. त्यानंतर हळूहळू काँग्रेसअंतर्गत एक लहान ताकदवान गट तयार झाला. हा गट पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यप्रणालीपासून अलिप्त होता. त्याचे समांतर काम सुरु होते. हा गट संजय गांधी यांना रिपोर्ट करीत असे. इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी संजय गांधी यांच्या खोलीत टेलिफोनची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

या माध्यमातून संजय गांधी हे इंदिराजींचे खासगी सचिव आर.के. धवन, काँग्रसचे शासित राज्याचे मुख्यमंत्री, पोलिस आयुक्त, दिल्लीचे उपराज्यपाल, पक्षाचे पदाधिकारी यांच्या संपर्कात राहायचे. त्यांना सूचना, आदेश ते देत असत. त्यांचा या व्यक्तीमध्ये दबदबा होता. आपले मुलाने दिलेल्या प्रशासकीय आदेशाचे खुद्द इंदिराजींना माहिती नसायची. संजय गांधी यांनी आर.के. धवन यांच्यासारखे अनेक मित्र जोडले होते. ते त्यांना मदत करीत असे. यात हरियाणा चे बन्सीलाल, मध्य प्रदेशाचे विद्याचरण शुक्ल, अंबिका सोनी आणि समाजवादी विचारसरणीच्या रुखसाना सुलताना यांचा समावेश होता.

आणीबाणी जाहीर होण्याच्या पाच दिवस आधी म्हणजे 20 जून 1975 रोजी संजय गांधी यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर एका मोठ्या रॅलीचे आयोजन केले होते. संजय गांधी यांनी आपल्या परिवाराचे मत वळवले होते. इंदिरा गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी,एकजूट दाखवण्यासाठी गांधी परिवार एकत्र आला होता. अशा राजकीय कार्यक्रमाक सहभागी होण्याची सोनिया गांधी यांची ही पहिली वेळ होती.

अशा परिस्थितीत संजय गांधी हे विरोधकांच्या निशाण्यावर आले होते. याविरोधात जयप्रकाश नारायण यांनी अनेक खासदारांना पत्र लिहिले होते. आपल्या व्यक्तीगत अधिकारी आणि लोकशाही मुल्यांचे रक्षण करण्याची मागणी केली होती. त्यांनी 'सिटिजन्स फॉर डेमोक्रासी' नावाचे संघटना स्थापन केली होती. त्यांचे ते मार्गदर्शक झाले होते. त्यांच्या समर्थकांची संख्या वाढत होती.

इंदिरा गांधी आणि काँग्रेसच्या विरोधात असलेल्या वर्तमान पत्रामध्ये संजय गांधी यांच्या विरोधात टीका जात होती, त्यांचा उल्लेख 'शैतान' असा केला जात असे. आपल्या विरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप संजय गांधी यांनी केला होता. आपल्या आईनं या विरोधात आवाज उठवला पाहिजे, असे त्याचे मत होते. कधीपर्यंत माझी आई विरोधकांना उत्तर देणार आता मीच माझ्यावरील आरोपांना उत्तर देणार, असे संजय म्हणत असे.

सरकारी कार्यक्रमात संजय गांधी यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे देशातील नागरिकांमध्ये गांधी परिवारांच्या विरोधात नाराजी पसरली होती. संजय गांधी यांनी काढलेल्या रॅलीनंतर पाच दिवसांनी रामलीला मैदानावर विरोधकांनी आपले शक्तीप्रदर्शन केले. जयप्रकाश नारायण यांनी पोलिसांना विनंती केली की तुमचे अंतकरण तुम्हाला परवानगी देत असेल तर तुम्ही आदेशाचं पालन करा, अन्यथा करु नका

दुसऱ्या दिवशी मंत्रीमंडळाची बैठक बोलवण्यात आली. लोकशाही स्थापित सरकारच्या परंपरा मोडीत काढीत इंदिराजींनी मंत्रीमंडळातील आपल्या सहकाऱ्यांचा कुठलाही सल्ला न घेता, चर्चा न करता, देशात आणीबाणी लागू करण्याचे आदेश दिले. यामुळे इंदिराजींनी अनेक अधिकार मिळाले, त्यामुळे देशातील नेते, नागरिकांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT