Milind Naik

 

Sarkarnama

विश्लेषण

अखेर गंभीर आरोपांनंतर भाजपच्या नेत्याचा मंत्रिपदाचा राजीनामा

मागील काही दिवसांपासून विरोधकांनी नाईक यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्याचे (Goa) नगर विकास मंत्री आणि भाजपचे (BJP) आमदार मिलिंद नाईक (Milind Naik) यांनी बुधवारी रात्री उशिरा मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या सेक्स स्कँडलमध्ये (Sex Scandle) सहभागी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने (Congress) केला होता. मागील काही दिवसांपासून त्यावरून गोव्यातील राजकारण तापलं होतं. अखेर नाईक यांनी या प्रकरणाची चौकशी योग्यप्रकारे व्हावे, या उद्देशाने राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने बुधवारी रात्री उशिरा एक निवेदन प्रसिध्द करत याबाबत स्पष्ट केलं आहे. नाईक यांनी मुक्त आणि कोणत्याही दबावाशिवाय चौकशी व्हावी, यासाठी राजीनामा दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. कार्यालयाने याबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नाईक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून तो स्वीकारण्यात आला आहे. त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे.

नाईक हे दक्षिण गोव्यातील मोरमुगावो मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्याकडे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या मंत्रिमंडळात नगर विकास हे महत्वाचे खाते होते. दिवंगत मनोहर पर्रीकर (Manohar Parikar) यांच्या मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश होता. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी नाईक यांच्यावर सेक्स स्कँडलचे आरोप केले होते. मंत्रिपदाचा गैरवापर करून ते महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप करत त्यांनी राजीनाम्याची मागणी केली होती.

काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी पणजीच्या महिला पोलिस स्थानकामध्ये नाईक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. सोबत या संबंधित सर्व पुरावे सादर केले होते. या मंत्र्यांवर कारवाई ची मागणी केली जात होती. अखेर नाईक यांनी बुधवारी रात्री उशिरा राजीनामा दिला आहे. पुढील काही दिवसांवर गोव्यात विधानसभेची निवडणूक (Assembly Election) होत आहे. यापार्श्वभूमीवर हे प्रकरण बाहेर आल्याने भाजपवर नामुष्की ओढवली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांतर कॅबिनेट मंत्र्याला राजीनामा द्यावा लागत असल्याने भाजपसमोरील अडचणी वाढल्या आहे. आता काँग्रेससह इतर विरोधी पक्ष या मुद्यावरून भाजपला कोंडीत पकडणार, हे निश्चित आहे. आगामी प्रचार सभांमध्ये हा मुद्दा उचलून धरत भाजपला अडचणीत आणले जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT