Omraje Nimbalkar Sarkarnama
विश्लेषण

Dharashiv Lok Sabha News : तब्बल 28 वर्षांनंतर इतिहास बदलला; उमेदवार शिवसेनेचा पण लढणार धनुष्यबाणाविना

Political News : धाराशिव मतदारसंघात पहिल्यांदाच धनुष्यबाण चिन्हाशिवाय निवडणूक होणार आहे. त्यामुळे धनुष्यबाणाशिवाय होणाऱ्या या पहिल्याच निवडणुकीत उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिलेले शिलेदार मशाल चिन्हाच्या जोरावर बाजी मारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sachin Waghmare

Election news : एकेकाळी मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघांवर भाजप-शिवसेनेचे एक हाती प्रभुत्व होते. मराठवाड्याची आेळख त्याकाळी शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला अशीच राहिली आहे. दोन्ही पक्षांचे समसमान खासदार निवडून येत होते. विशेषतः परभणीत शिवसेनेचा गेल्या 35 वर्षांपासून फक्त शिवसेनेचाच खासदार निवडून येतो, तर १९९६ पासून सलग 28 वर्षांपैकी दोन वेळेसचा अपवाद वगळता हा शिवसेनेचा बाल्लेकिल्ला राहिला आहे. या ठिकाणी शिवसेनेचे चार खासदार निवडून आले.

धाराशिव मतदारसंघात पहिल्यांदाच धनुष्यबाण चिन्हाशिवाय निवडणूक होणार आहे. त्यामुळे धनुष्यबाणाशिवाय होणाऱ्या या पहिल्याच निवडणुकीत उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) एकनिष्ठ राहिलेले शिलेदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Om Rajenimbalkar) मशाल चिन्हाच्या जोरावर बाजी मारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

1990 च्या दशकात मराठवाड्यात शिवसेनेची मोठी क्रेझ होती. मराठवाडा हा शिवसेनेचा बाल्लेकिल्ला होता. त्या काळात आलेल्या बाळासाहेब ठाकरे नावाच्या वादळाने काँग्रेसचा सुपडासाफ केला होता. (Dharashiv Lok Sabha 2024 News).

जून 2022 मध्ये शिवसेनेत मोठी उभी फूट पडली. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील 40 आमदार व 13 खासदार बाहेर पडले. त्यानंतर एकनाथ शिंदे भाजपसोबत गेल्याने ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर एकनाथ शिंदेसॊबत गेलेले आमदार व खासदार म्हणजेच खरी शिवसेना म्हणून त्यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना पक्षाचे नाव दिले.

आता 2024 मध्ये होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत ठाकरे गटाला धनुष्यबाण शिवाय निवडणूक लढवत आहे. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे एकेकाळी शिवसेनेचे बालेकिल्ले असलेल्या धाराशिवमध्ये मशाल विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ अशी लढत होणार आहे .

धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर 1991 मध्ये भाजपच्या विमल मुंदडा यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवली होती, तर 1996-98 मध्ये या मतदारसंघातून शिवसेनेचे शिवाजी कांबळे हे पहिल्यांदा धनुष्यबाण चिन्हावर विजयी झाले. 1998-99 मध्ये काँग्रेसचे अरविंद तुळशीराम कांबळे विजयी झाले, तर 1999-2004 मध्ये शिवसेनेचे शिवाजी विठ्ठलराव कांबळे यांनी धनुष्यबाण चिन्हावर बाजी मारली.

2004 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या खासदार कल्पना नरहिरे या पहिल्यांदाच महिला खासदार येथून धनुष्यबाण चिन्हावर निवडून आल्या. त्यांनी तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे याना अडीच हजार मतांनी पराभूत केले होते.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ पहिल्यांदाच सर्वसाधारण गटासाठी खुला झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. पद्मसिंह पाटील व शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांच्यात चुरशीची लढत झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. पद्मसिंह पाटील अवघ्या पाच हजार मताने निवडून आले. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या रवींद्र गायकवाड यांनी डॉ. पद्मसिंह पाटील यांचा अडीच लाख मताने पराभव करीत या मतदारसंघावर परत एकदा शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित केले होते.

2019 च्या निवडणुकीत शिवसेनेने तत्कालीन खासदार रवींद्र गायकवाड यांची तिकीट कापले. त्यानंतर शिवसेनेने या ठिकाणी धक्कातंत्राचा वापर करीत ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी धनुष्य बाण चिन्हावर जवळपास सव्वा लाखाच्या मताधिक्याने तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा सहा लाखांपेक्षा अधिक मताने पराभव केला. या निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला जवळपास 49% तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार 38% मिळाली होती.

28 वर्षांच्या इतिहासात शिवसेनेचे शिवाजी कांबळे (Shivaji Kamble) दोन वेळा, कल्पना नरहिरे, रवींद्र गायकवाड (Ravindra Gaikwad), ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे धनुष्यबाण चिन्हावर एक वेळा निवडून आले. या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे खासदार राजेनिंबाळकर हे पहिल्यांदाच मशाल चिन्हावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे येत्या काळात धनुष्यबाणाशिवाय निवडणूक लढवावी लागत असल्याच्या सहानुभूतीचा फायदा कितपत होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT