85 वर्षांनंतर काँग्रेस CWC ची बैठक सदाकत आश्रमात झाली.
काँग्रेसने 2020 मध्ये आरजेडी युतीसोबत 70 जागा लढल्या.19 जागा जिंकल्या
काँग्रेस 70 जागा मागत आहे. आरजेडी 50–55 जागा देण्याच्या भूमिकेत आहे,
महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद यांनी बिहार मधून स्वातंत्र्यलढ्यादरम्यान अनेक चळवळी सुरू केल्या. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक चळवळींचा पाया येथूनच घातला गेला. पाटणा येथे काल (बुधवार) 1940 नंतर प्रथमच कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. ही बैठक सदाकत आश्रमाच्या प्रदेश काँग्रेस कार्यालयात आयोजित केली होती. एकेकाळी सदाकत आश्रम हा बिहारमधील सत्तेचे केंद्र होता.
85 वर्षांनंतर बिहारमध्ये अशी बैठक झाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या या बैठकीचे राजकीय तज्ज्ञ अनेक अर्थ लावत आहेत. अनेक दशकांनंतर बिहारमध्ये काँग्रेस सक्रिय होताना दिसत आहे. 85 वर्षांनंतर बिहारमध्ये काँग्रेसच्या सीडब्ल्यूसीची बैठक का झाली, विधानसभा निवडणुकीपूर्वी याचा अर्थ काय? अशी चर्चा यानिमित्ताने सुरु झाल्या आहेत.
सदाकत आश्रमाच्या ठिकाणी बैठक घेऊन भूतकाळातील संघर्षाला वर्तमानाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसते. निवडूक होत असलेल्या एखाद्या राज्यात अशा बैठकीची आयोजन करणे हा काँग्रेसचा पहिला प्रयोग नाही, यापूर्वीही काँग्रेसने असे प्रयोग केले आहेत. यात काँग्रेसला काही प्रमाणात यश मिळाले आहे.
2023 मध्ये तेलंगणा विधानसभा निवडणुकीदरम्यान कॉंग्रेसने तेथे सीडब्ल्यूसीची मोठी बैठक घेतली. त्यानंतरच्या निवडणुकांचे निकाल कॉंग्रेसच्या बाजूने होते. पक्षाला पुन्हा एकदा अशाच चमत्काराची बिहारमध्ये आशा आहे.
पाटणा येथील बैठकीला मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि पक्षाचे अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते.राहुल गांधी यांच्या भेटी होत आहेत. राहुल यांनी राज्यात मतदार हक्क यात्राही काढली आहे.
गेल्या निवडणुकीत (2020) काँग्रेसने राष्ट्रीय जनता दलासोबत युती करून एकूण 70 जागा लढवल्या होत्या. या 70 जागांपैकी काँग्रेसला केवळ 19 जागांवर यश मिळाले आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा स्ट्राईक रेट सुमारे 27 टक्के होता. युतीतील इतर पक्षांमध्ये हे सर्वात कमी होते.
मागील विधानसभा निवडणुकी प्रमाणे यंदाही काँग्रेस राष्ट्रीय जनता दलासोबत युती करून निवडणूक लढवत आहे. मात्र, जागा वाटपावरून वाद सुरूच आहे. काँग्रेसला पुन्हा केवळ 70 जागा लढवायच्या आहेत. मात्र, यावेळी आरजेडी काँग्रेसला इतक्या जागा देण्याच्या मन:स्थितीत नाही. लालू आणि तेजस्वी नवीन मित्रपक्ष आणि मागील कामगिरीचा दाखला देत काँग्रेसला ५० ते ५५ जागा देण्याविषयी बोलत आहेत.
2020 च्या बिहार निवडणुकीत काँग्रेसने 70 पैकी 19 जागा जिंकल्या होत्या. म्हणजेच त्याचा स्ट्राईक रेट सुमारे 27 टक्के होता, जो आरजेडी (स्ट्राईक रेट – 52 टक्के), सीपीआय (एमएल) (63.15 टक्के), सीपीआय (33.33 टक्के) आणि सीपीआय (50 टक्के) या मित्रपक्षांपेक्षा कमी होता. अशा परिस्थितीत काँग्रेसला अधिक जागा देणे महाआघाडीसमोर मोठे आव्हान असेल. यावेळी झामुमो, व्हीआयपी आणि पशुपती पारस यांचा आरएलपी देखील या आघाडीत सामील झाला आहे. त्यांच्यासाठीही जागा कोण सोडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Q1: सदाकत आश्रमातील काँग्रेस बैठकीचे महत्त्व काय आहे?
A1: हे स्वातंत्र्यलढ्याचे केंद्र, काँग्रेसने वारसा आणि वर्तमान राजकारण जोडण्याचा प्रयत्न केला.
Q2: 2020 च्या बिहार निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी कशी होती?
A2: काँग्रेसने 70 जागांवर लढून फक्त 19 जागा जिंकल्या (27% स्ट्राईक रेट).
Q3: यावेळी काँग्रेस किती जागा मागत आहे?
A3: काँग्रेस पुन्हा 70 जागा मागत आहे, पण आरजेडी 50–55 जागांपर्यंतच तयार आहे.
Q4: आघाडीत नवे कोणते पक्ष सामील झाले आहेत?
A4: झामुमो, व्हीआयपी आणि पशुपती पारस यांचा आरएलपीही आघाडीत सामील झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.