Eknath Shinde, Nitish Kumar Sarkarnama
विश्लेषण

Nitish Kumar News : नितीश कुमार बिहारचे ‘एकनाथ शिंदे’ ठरणार? भाजपचा एक निर्णय राजकारण फिरवणार...

BJP Political Move Bihar CM Update Ednath Shinde : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद आले होते.

Rajanand More

Bihar Politics : बिहारमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नाराज आमदारांना खूष करण्याचा प्रयत्न केला. पण मंत्रिपदाची शपथ घेतलेले सर्व आमदार भाजपचे होते, हे विशेष. मागील काही दिवसांत भाजप आणि संयुक्त जनता दलामध्ये नेतृत्वावरून खटके उडत असताना झालेला हा शपथविधी भाजपच्या कुटनीतीचे पहिले पाऊल मानले जात आहे.

बिहारच्या राजकारणात नितीश कुमार यांनी अनेकदा पलटी मारली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रीय जनता दलाची साथ सोडत त्यांनी भाजपचा साथ दिली. त्यानंतर ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. आता आगामी निवडणुकीनंतरही आपल्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडावी, यासाठी त्यांची जोरदार तयारी सुरू आहे. पण राज्यात पहिला मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपही जोर लावणार, हेही तितकेच खरे. पण ते एवढे सोपे नाही, याची जाण भाजपच्या चाणक्यांनाही आहे.

महाराष्ट्रातील खेळी

महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी उठाव करत शिवसेनेत मोठी फूट पाडली. त्यानंतर त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली आणि मुख्यमंत्री झाले. जवळपास अडीच वर्षांनंतर राज्यात विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत महायुतीला अनपेक्षित बहुमत मिळाले. भाजपसह शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही घवघवीत यश मिळाले. पण मुख्यमंत्रिपदी कोण बसणार, यावरून बरेच राजकारण झाले. अखेर भाजपने शिंदेंची समजूत काढत देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकली.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

मुख्यमंत्रिपदावरून महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेतील नेत्यांचे दावे-प्रतिदाव्यांचे राजकारण चांगलेच रंगले होते. शिंदेंची नाराजीही त्यांनी लपवण्याचा प्रयत्न करूनही समोर आली. उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास त्यांचा नकार, यातूनच सर्वकाही स्पष्ट झाले. निवडणुकीदरम्यान भाजपने एकदाही शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती निवडणूक लढत असल्याचे म्हटले नव्हते. तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती. निवडणुकीनंतर सीएमचा फैसला होईल, असेच सर्वजण बोलत होते.

नितीश कुमारांचेही तेच होणार?

बिहारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री असले तरी त्यांचे आमदार भाजपपेक्षा जवळपास निम्म्याने कमी आहेत. पण विरोधकांना दूर ठेवण्यासाठी भाजपने हे विष पचवले. आणखी रिस्क घेण्यास राज्यातील नेते आता तयार नसल्याचे चित्र आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यास नेते राजी होणार नाहीत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत निवडणुकीला सामोरे जाण्याची रणनीती बनवली जात आहे. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निवडणुकीनंतर घेण्यावरही येथील भाजपचे नेते आग्रही आहेत. त्यामुळे नितीश कुमार यांची अवस्थाही एकनाथ शिंदे यांच्यासारखी तर होणार नाही ना, अशी चर्चा आहे.

भाजपने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नितीश कुमार हेच एनडीएचा चेहरा असतील, अशी घोषणा न केल्यास निवडणुकीनंतर महाराष्ट्राचीच पुनरावृत्ती होणार हे निश्चित आहे. भाजपचा हाच निर्णय नितीश कुमार यांचे भवितत्व ठरवेल. मागील निवडणुकीप्रमाणेच आगामी निवडणुकीत भाजप जेडीयूपेक्षा अधिक जागा मिळेल, अशा आशा नेत्यांना आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास असा सहजासहजी नितीश कुमारांच्या ताटात टाकण्याचे धाडस भाजपचे चाणक्य करणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT