Ashok Chavan, devendra Fadanvis  Sarkarnama
विश्लेषण

Ashok Chavan : 'या' नेत्यांच्या विरोधामुळेच चव्हाणांचा मंत्रिपदाचा पत्ता कट; खासदारकीवर बोळवण

Political News: २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा आघाडीचे सरकार आले. त्यावेळी सोनिया गांधी व राहुल गांधींनी अशोक चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवला होता.

Sachin Waghmare

Congress News: मुंबईत 2008 मध्ये अतिरेक्यांनी दहशतवादी हल्ला केला होता. त्यावेळी विलासराव देशमुख त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र, या घटनेनंतर विलासरावांना तडकाफडकी राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम अशी खूप नावे चर्चेत होती, पण त्यांना डावलून मुख्यमंत्रिपदाची सूत्रं अशोक चव्हाणा यांना दिली होती. त्यावेळी मुख्यमंत्री हा मराठवाड्याचा असायला हवा, असा सूर बैठकीत निघाला होता. त्यामुळे अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली होती.

यानंतर २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा आघाडीचे सरकार आले. त्यावेळी सर्व मात्तब्बरांना बाजूला ठेवून सोनिया गांधी व राहुल गांधींनी अशोक चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवला होता. त्यामुळे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले होते. काँग्रेसने प्रत्येकवेळी त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला. २०१४ मध्ये त्यांना नांदेडमधून तर राजीव सातव यांना हिंगोलीतून निवडणूक रिंगणात उतरवले होते. त्यात ते यशस्वी झाले अन् राज्यातून मोदी लाटेत काँग्रेसचे केवळ दोनच उमेदवार विजयी झाले होते. त्यामध्ये चव्हाण व सातव यांचा समावेश होता.

काँग्रेसने अशोक चव्हाण यांना सर्व काही भरभरून दिले होते. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना एक लाखाच्या फरकाने भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. त्यानंतर ते भोकर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसमधील काही नेत्यांचा विरोध असताना त्यांची महसूलमंत्री वर्णी लागली होती.

त्यानंतर शिवसेनेमधील फुटीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर आघाडी सरकारमधील त्यांचे काही सहकारी असलेले महायुतीमध्ये जाऊन मंत्री झाले हॊते. त्यामुळे अशोक चव्हाण नेहमीच काँग्रेस पक्ष सोडणार अशा चर्चा होत्या. मात्र, स्थानिक भाजप नेत्यांचा त्यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध होता. त्यामुळे अशोक चव्हाण काँग्रेस प्रवेशासाठी इच्छुक असले तरी त्यांच्या प्रवेशात अडचणी येत होत्या.

एकेकाळी अशोक चव्हाण यांचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशी मित्रत्वाचे संबंध होते. मात्र, त्यांच्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोडावी लागली, असा चिखलीकरांना वाटत होते. त्यामुळे दोघातील संबंध ताणले गेले. शिवसेना सोडून चिखलीकरांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत त्यांनी अशोक चव्हाणांचा पराभव केला होता. त्यामुळे दोघांतील मतभेद वाढले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसरीकडे अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे भाजपमध्ये प्रवेश करणार हे काही दिवसांपासून पुढे येत होते. मात्र, त्यांना भाजपमध्ये घेऊन राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्यास भाजप नेत्यांचा विरोध होता. त्यामुळे अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश बराच दिवस रखडला होता. मात्र, आगामी काळात होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देऊन काँग्रेसच्या मतांवर चौथी जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न आहे.

त्यामुळे भाजपकडून (Bjp) राज्यसभेची उमेदवारी देऊन अशोक चव्हाण यांना रिंगणात उतरविण्यात येणार आहे. यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. चव्हाण यांना राज्यसभा दिली जाणार असून, त्यांना राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद दिले जात नसल्याने प्रवेशाला विरोध करणाऱ्या या नेत्यांचादेखील विरोध मावळला आहे.

R

SCROLL FOR NEXT